Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदेश-विदेशनागपूरविदर्भसाहित्यगंध

लिओनार्दो दा व्हिंची ‘मोनालिसा’

लिओनार्दो एक चित्रकार

0 4 8 2 8 4

लिओनार्दो दा व्हिंची ‘मोनालिसा’

लिओनार्दो एक चित्रकार

जगभर प्रसिद्ध असलेले एक चित्र केसाचे बट पुढे आलेले. पूर्ण बाह्याची कुर्ती घातलेली, काळ्या ओळणीत असलेली. डोळ्यात कसली तरी चमक,चेहर्‍यावर एक स्मित हास्य आजही भल्या भल्यांना कोड्यात टाकतं होय हे जगप्रसिद्ध असलेले चित्र मोनालिसाचे वर्णन. आणि विशेष म्हणजे याला पूर्णाकृतीत आणणारा चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची… कोण होता ? उंचच उंच पर्वताच्या उतारावरचं इटली मधील व्हिंची नावाचं एक छोटसं गाव. एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्याशार पाण्याची नदी. तर दुसरीकडे मोठमोठे खडक अशा सुंदर निसर्गरम्य गावात 15 एप्रिल 1452 आई कॅटरिना व वडील पिअरो यांच्या पोटी लिओनार्दो दा व्हिंचीचा जन्म झाला. लहान असताना लिओनार्दो ला चित्रकला,संगीत, पक्षी,प्राणी,गणित ,विज्ञान याबद्दल नवल वाटायचं डोंगरदऱ्यातून मनसोक्त भटकायला आवडायचं. वडील सुध्दा त्याला याकरीता कधीच रागवत नसत. लिओनार्दोला चित्र काढायला एवढं आवडत असे की, आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजे म्हणून तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ इत्यादीचे तहानभूक विसरून त्याचं निरीक्षण करीत बसे.

पिअरोचे कुटुंब लिओनार्दो दहा बारा वर्षांचा असताना फ्लोरेन्स शहरात राहायला आलेत. हे शहर चित्रकार, शिल्पकार, बुद्धिवंत,कारागीर, व्यापारी,श्रीमंत तत्वज्ञ याचं हे शहर होत. त्यावेळेस या शहरात विख्यात चित्रकार व्हेरोशिओ यांच्याकडे वयाच्या चौदाव्या वर्षांपासून ते सत्तावीसाव्या वर्षांपर्यंत लिओनार्दोनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं.ज्यात त्याला अडचण भासायची त्याचं तो शिक्षण घ्याचा गणित, तंत्रज्ञान याव्यतिरिक्त विश्व कसं निर्माण होत, प्रलय का आणि कसा होतो ? याकरीता त्यानं खगोलशास्त्त्राचाही अभ्यास केला.गंमत म्हणजे स्वतःला सुचना दयाच्या असल्यास ते एका वहीत टिपन म्हणून नोंद करून ठेवायचा. चित्र काढताना प्रत्येक अवयवाचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पध्दतीने नोंदी करून मगच तो रेखाटन करत असे.लिओनार्दोनं लिहेन ठेवलं होतं की, “शिल्पकार दगडाला नको असलेला भाग काढत राहतो.पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो”. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवात करत नसे.

मोनालिसाचे चित्र यामागे सुध्दा त्याचे परिश्रम आहेत. ‘फ्रान्सेस्को दी बाटोॅलामिओ डेल गिओकोंडो’ नावाच्या एका व्यापाराची मोनालिसा पत्नी होती. वयाच्या चौवीसव्या वर्षी तिचे हे चित्र काढताना, मोनालिसा हिला माॅडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये, म्हणून तिच मन रमविण्यासाठी गायक वादकही ठेवले होते. ही पेंटिंग बनवायला लिओनार्दोला 1503 ते 1517 अशी एकूण 14 वर्ष लागलीत 12 वर्ष तर मोनालिसाचे ओठ बनविण्यास लागले.असे म्हणतात की याच कालावधीत लिओनार्दोच्या आईचे निधन झाल्यामुळे पेंटिंगच्या चेहर्‍यावर दुःखाचे भाव दिसतात. मोनलिसाच्या चेहर्‍यावरील हास्य वेगवेगळया बाजुनी बघितल्यावर वेगवेगळे दिसतात.मोनालिसाच्या चेहर्‍यावर मनुष्याची छटा जानविते या पेंटिंगमध्ये लिओनार्दो ने आपला चेहरा बनविण्याचा प्रयत्न केला असे काहीचे मत आहे.

कारण पेंटिंग मधील चेहरा,डोळे,नाक हे व्हिंचीच्या चेहर्‍याशी साम्य मिळतात. मोनालिसा पेंटिंगच्या आत बरेच रहस्य दडलेले आहे संशोधकांनी जेव्हा या पेंटिंगला हायटेक मायक्रोस्कोप आणि स्पेक्टालाईट टेक्नालाॅजी हाॅय एन्टासिटी प्रकाशाव्दारे संशोधन केल्यावर अक्षर,अंक,चिन्ह आढळलेत. उजव्या डोळ्यात LV अर्थात लिओनार्दो व्हिंची असा अर्थ निघतो. डाव्या डोळ्यातील अक्षरे पुसट झाली होती.ही पेंटिंग अपूर्ण आहे असे म्हणतात. कारण लिओनार्दोचे याच कालावधीत निधन झाले. “मोनालिसा ” हे पेंटिंग मधे चोरीला गेली होती. त्यानंतर या पेंटिंगला काचेच्या सुरक्षित लाॅकरमध्ये ठेवण्यात आले. आज ते पॅरिसच्या ‘लुव्र’ संग्रहालयात आहे. या पेंटिंगची किंमत आता पाच हजार करोड रूपये आहेत.लिओनार्दो दिसायला अत्यंत देखना होता.छान कपडे घालणे व टापटीप राहणे लिओनार्दोला खुपच आवडे.त्याचा आवाजही सुरेल होता. तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत.तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे. तो सगळ्याशी प्रसन्न आणि मिळून मिसळून राहायचा.

लिओनार्दो हा एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्र, शरीरशास्त्र, गणिती,वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अंभियता, साहित्यिक,संगीतकार, लेखक तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ या सगळया भुमिका निभावणारा कलावंत होता. लिओनार्दोनी काढलेल्या ‘मॅडोना ऑन दी राॅक्स’, ‘लास्ट सपर’ आणि “मोनालिसा” यासारख्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. 2 मे 1519 ला वयाच्या सदुष्टाव्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला. आपली चित्र, शिल्प, बांधलेल्या इमारती, पूल हे सारं जगासाठी तो आपल्या मागे ठेवून गेला.आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयावर टिपणं करून ठेवली होती. साडेतीन हजार पानं होतील अशा त्याच्या एकोणवीस वह्या आजही उपलब्ध आहेत.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे