मी अनुभवलेला पुस्तक प्रकाशन सोहळा व काव्यमैफील
सौ माधुरी काळे वणी जिल्हा यवतमाळ
मी अनुभवलेला पुस्तक प्रकाशन सोहळा व काव्यमैफील
छत्रपती संभाजी नगरीत सारस्वतांची वारी अतिशय आनंदाचा दिवस सात मे या तारखेला पहिल्यांदाच मराठीच्या शिलेदार समूहातील सर्व ताई दादांची होणारी ओळख, कोण कोण असेल आपली ओळख होईल ना तिथे गेल्यावर अनेक प्रश्न मनात घर करून जातं असताना.
आमचे लाडके दादा आम्ही शब्दांचे पुजारी आ. विष्णू दादा यांचा रात्री 11 च्या सुमारास फोन आला,कुठे आहात, पोहोचलात का? कुठे राहणार?, काही अडचण आल्यास मला कॉल कराल, आणि उदयाला वेळेत पोहोचाल बरं आपल्याला कार्यक्रम वेळेत सुरु करायचा आहे. असे आपुलकी, काळजी करणारे प्रश्न विचारून अनोळखी शहरात ओळखीचे आमचे दादा. खरं तर दादा अन मी समूहात असताना बोलायचो. एक आपुलकीची माया नेहमीच त्यांच्या बोलण्यातून झळकायची अन बघता बघता मायेचा भवसागर आ. विष्णू दादा यांची माझ्याशी भेट झाली. पहिल्यांदाच भेटले पण दादा ला भेटल्यावर असे वाटले की खूप वर्षा पासून ची ओळख आहे.हक्काने बोलले चला नास्ता करून घ्या पहिले अन मग थोडी मदत करा.
आज तुमच्याशी बोलताना अतिशय आनंद होतं आहे मला की, मी आज तुमच्या सर्वांसोबत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित झाली माझाही मला मधूमनतरंग काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची संधी मिळाली अन स्वप्नपूर्ती झाली यांचे संपूर्ण श्रेय आ. विष्णु दादा यांना आहे. त्यांनी जर आग्रह केला नसता.तर आज मी बघितलेले स्वप्न कधीच पूर्ण झाले नसते.
दादा नेहमी म्हणायचे तुम्हाला काय मदत हवी मी करतो पण तुमचा काव्यसंग्रह प्रकाशित व्हायलाच हवा. दादांनी काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ, नाव, मनोगत, प्रस्तावना या संपूर्ण बाबीची माहिती मला दिली. अन वेळोवेळी मार्गदर्शन पण केले. खरं तर या प्रकाशन सोहळ्यात दादांचे आभार मानावे तेवढे कमी आहे.
नंतर काही कालावधीत कार्यक्रम ची तयारी झालेली सूत्रसंचालन करिता आमच्या समूहातील अतिशय सोज्वळ, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले आ. प्रशांत ठाकरे सर आणि आ. सविता पाटील ठाकरे मॅडम या मेड फॉर इच अदर, एक आदर्श व्यक्तिमत्व, अनुभवायला मिळाले तो दिवस माझ्यासाठी भाग्याचा दिवस, सविता ताईंच्या सुरेख सुमधुर आवाजात जिजाऊ वंदना ने कार्यक्रमाची सुरुवात सर्व कसं अतिशय सुंदर आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सुरु होते. पाहुण्यांना स्थानापन्न करून स्वागत सोहळा हा पार पडला त्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा, सूत्रसंचालनाची धुरा ही माननीय प्रशांत ठाकरे सरांकडे अतिशय आकर्षक ठळक आवाजात प्रत्येक काव्यसंग्रहाचे अल्पसा परिचय ठाकरे सरांनी करून दिला. एका पाठोपाठ एक काव्यसंग्रह प्रकाशित होऊ लागला मानपत्र सन्मान चिन्ह जागर मराठीचा साहित्यगंध अंक देऊन सन्मान करण्यात आला. हा सोहळा म्हणजे मी अनुभवलेला अविस्मरणीय क्षण होता.
यानंतर आमच्या जागर मराठीचे पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पावसाने सुद्धा दमदार हजेरी लावले आनंदाने वादळ वारा झाडे हलू लागली जणू काही त्यांनी आमच्या या काव्यसंग्रहास भरभरून शुभेच्छा दिल्या. मग थोड्यावेळाने आम्ही जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी निघालो . आहाहा काय सुंदर अप्रतिम जेवण मसाले वांगे,आलू ची भाजी, गुलाबजामून,मठ्ठा, सगळं ला जवाब होता छान पैकी आरामशीर बसून आम्ही सगळ्यांनी जेवण केल आणि बघता बघता सगळं वातावरण शांत झालं पाऊस पण परतला त्यानंतर सुरू झाली ती काव्यमैफिल यात अनेक मराठीचे शिलेदार समूहातील कविवर यांनी कविता सादर केली. सर्वांच्या वेगवेगळ्या छान आवाजात दमदार असे सर्वांचे काव्य गायन झाले त्यानंतर परीक्षण करून पारितोषिक देण्यात आले.
यानंतर संधी होती ती आम्हाला पुस्तक प्रकाशनाबद्दल मनोगत व्यक्त करण्याची वेळ खूप झालेला होता त्यामुळे सगळे म्हणत होते की मॅडम आपणा सर्वांना फक्त दोन मिनिटं ते तीन मिनिट इतका कालावधी आहे तर कृपा करून सर्वांनी वेळेचं भान ठेवायचा कारण पाच वाजत आले होते सर्वांना मनोगत व्यक्त करण्याची संधी द्यायची होती आयोजकांचे नियोजन सगळ्या बाबी लक्षात घेता. लिहून आणलं होतं ते मनोगत सांगायला गेले तर बराच वेळ लागेल म्हणून जितके आठवलं तेवढं तिथे मनोगत मी व्यक्त केलं. त्यावेळी सर्वांनीच मनोगत खूप छान व्यक्त केले. त्या सर्वान मध्ये मला भावलेले मनोगत म्हणजे सारिका ताई वाई सातारा अतिशय छान व्यक्त झाल्या त्या.
मला कुठेतरी खंत होती की मला बोलता नाही आलं थोडंसं बोलले असते असं वाटतं होते पण संधीच सोन करता आले नाही पण या समूहात जोडल्या गेल्यावर अश्या अनेक संधी आपणास मिळेल. म्हणून स्वतःला समजावले
मग शेवटी शेवटी सर्वांनी आम्ही मिळून एक फोटो घेतला. आज त्यांच्यामुळे माझा कवितासंग्रह प्रकाशित झाला आमचे आदरणीय विष्णू दादा यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रेरणेमुळे आज हा सुंदर सोहळा अनुभवायला मला मिळाला. मी माधुरी काळे आदरणीय विष्णू दादांचे मनःपूर्वक आभार मानते
आमच्या मराठीच्या शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल पाटील सर त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते म्हणजे वटवृक्ष समूहातील सर्व कविवर्यांना आपल्या छत्रछायेखाली ठेवून मराठी भाषा सक्षमीकरणाचा ध्यास लावतात. साधं सोपं नसते इतके सारे समूहांमधील 2000 अडीच हजार लोकांना एकत्र बांधून ठेवून कार्यक्रम करणे नियोजन करणे रूपरेषा आखणे सोप नसते तरीपण आमचे राहुल दादा म्हणजे एक जादूची काडी, त्यांच्यात असलेले संवाद कौशल्य सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याची कला ज्यामुळे सर्व कार्यक्रम यशस्वी होताना आपल्याला दिसते… आदरणीय राहुल पाटील सर सरांचे सुद्धा मनःपूर्वक आभार मानते.सर्वात महत्त्वाचा आणि माझ्या काव्यसंग्रहातील अविभाज्य असा घटक म्हणजे माझ्या काव्यसंग्रहाला मिळालेली स्वातीताईंची प्रस्तावना, अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून सहज सोप्या भाषेत अतिशय सुंदर लेखन ताईंनी केले. ताईला सर्वप्रथम बघताच तोंडून उच्चार निघालेत ते म्हणजे साधी राहणीमान उच्च विचार असे आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या स्वातीताई यांचीही मी मनःपूर्वक आभार मानते.
सौ माधुरी काळे
वणी जिल्हा यवतमाळ



