स्व. श्रीनिवास बाळाराम भगत यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने सुश्राव्य संगीत भजन मैफिलीचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

स्व. श्रीनिवास बाळाराम भगत यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने सुश्राव्य संगीत भजन मैफिलीचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग/ रायगड: दि.१ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी आवास येथील सामाजिक कार्यकर्ते व संगीत भजन प्रेमी श्रीनिवास बाळाराम भगत यांचे दुःखद निधन झाले. बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी आवास [ भगत आळी ] येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा पाचवा पुण्यस्मरण दिन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने त्यांचे पुत्र हितेश श्रीनिवास भगत व विराज श्रीनिवास भगत यांनी सुश्राव्य संगीत भजन मैफिलीचे आयोजन केले होते. सर्वप्रथम स्वर्गीय श्रीनिवास बाळाराम भगत यांच्या प्रतिमेचे त्यांच्या पत्नी श्रध्दा श्रीनिवास भगत, पुत्र हितेश श्रीनिवास भगत, विराज श्रीनिवास भगत, स्नुषा राजश्री हितेश भगत, मानसी विराज भगत व उपस्थितांनी पूजन केले. त्यानंतर संगीत भजन मैफिलीस प्रारंभ करण्यात आला. हितेश भगत व विराज भगत यांनी मैफिलीतील सर्व कलाकारांचे व उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत केले.
या संगीत भजन मैफिली मध्ये उस्ताद रशीद खान यांचे शिष्य नागेशजी आडगावकर, लातूर व पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचे शिष्य चैतन्यजी परब, रत्नागिरी या दोन गायकांचे सुमधुर गायन झाले. पखवाज साथ सुखद मुंडे, पुणे यांनी केली तर तबला साथ पांडुरंग पवार, पुणे यांनी केली. हार्मोनियमची साथ वैष्णव देवसरकार, हिंगोली यांनी केली. या संगीत भजन मैफिलीत धनंजय सुरेश भगत, आवास यांनी अतिशय सुंदर असे निवेदन केले. सर्व कलाकारांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमासाठी जागतिक किर्तीचे पखवाज वादक माणिकजी मुंडे, अलिबाग तालुका पंचायत समिती माजी सदस्य तथा आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रणजीत राणे, बोरीस ग्रामपंचायत माजी सरपंच महेश पडते, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे कार्यकारिणी सभासद दिपक राऊळ व अनिल राऊळ, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे विद्यमान सरचिटणीस तथा बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवासचे माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, आवास ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुधीर राऊळ, संगीतप्रेमी ऋषिकांत भगत, गजानन पाटील तसेच इतर मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



