इंडोनेशिया बाली प्रवास भाग: 4
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड,नागपूर
इंडोनेशिया बाली प्रवास भाग: 4
बालीचे वैशिष्ट्ये म्हणजे येथील घरे उतारू कौलाची. सर्व लोक प्रेमळ बोलतात. प्रत्येक घराच्या पुढे अंगणात किंवा दुकानात श्रध्देने छोट्या सुपात पुजेची फुले नियमित ठेवतात. येथील लोक प्रामाणिक आहेत, दुकानातून वस्तू चोरीला जात नाहीत. इथे जास्तीत जास्त दुकानात, माॅल, कंपनीत मुली किंवा स्त्रिया कामाला असतात. बाली येथील ‘मलाॅस्टी’ बीचवर सर्वात जास्त विदेशी पर्यटक येतात. येथे दोन्ही बाजूंनी समुद्राच्या खुप लाटा येऊन किनार्याला आदळतात. पर्यटक मनसोक्त पाण्याचा आनंद लुटतात. ‘उलवातू केक डाॅन्स’ या टेम्पल मध्ये रामायणावर आधारीत हा शो असतो एकाच वेळेस 40 माणसे गोलाकार करून च्याॅ चू, च्याॅ चू हातवारे करून नृत्य करीत होती.
झटक्यात हात वर करुन खाली करणे, वेगळा आवाज काढणे, अर्धा तासानी सीता, राम ,लक्ष्मण हनुमान, रावणच्या भूमिकेत असलेली पात्र येऊन नाटक चालू झालेत. स्टेडियम प्रमाणे प्रेक्षकांना बसून बघण्यास व्यवस्था होती. हा शो मंगळवार, गुरूवार व रविवारलाच असतो. टिकीट दर या शो चा 1,50,000 तर भारतीय रुपये 750 होतात. तिकडील 100000 लाख म्हणजेच आपले 500 रूपये होतात. या शो मध्ये शार्ट कपडे घालून जाता येत नाहीत त्यांना जांभळा,ऑरेंज दुप्पटा ओढावयास देतात. रात्रीचे जेवण करून आम्ही परत आपल्या स्वीस बेल एक्सप्रेस हाॅटेल मध्ये गेलोत.
दिनांक 12 ऑगस्ट 2024 ला ‘देसा अडट पेनगुलिपुरम’ या जागेस बालीचे सुंदर स्वर्ग म्हणतात. येथील सर्व घरे एकसारखी आहेत फक्त ओळख खूण म्हणजे घर क्रमांक लक्षात ठेवायचा असतो. प्रत्येकांच्या घरात कपडे, किराणा, चहा, मणी, बांगड्या, नाश्त्याची दुकाने आहेत. घराच्या आत पक्षी, प्राणी सुध्दा ते पाळतात. पर्यटक येथील कपडे रेन्टनी घेऊन फोटो काढतात. छान निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतात. येथील सर्व घरे सुंदर व दगडी गोट्याचे बांधकाम केलेले असून दिसायला एकसारखी आहेत. येथे प्रवेश करताच उतार रोड असून दोन्ही बाजूला एक सारखी घरे आहेत.
आमच्या शेजारील वावरे कुटुंबीय एका घरात जाऊन तेथील आवडीचे कपडे निवडून भरपूर आनंद घेतला. फोटो काढलेत, पण ड्रेस परत करताना त्यांना तेच घर शोधायला भरपूर विलंब लागला. कारण त्यांनी घर क्रमांक नोंद केला नव्हता. घराच्या अंगणात फुले, बाग असल्यामुळे आत सुध्दा फोटो काढू देतात. बालीतील सुंदर गाव म्हणून देसा पेनगुलिपुरम नावाजलेले आहे. त्यानंतर आम्ही सारी अमरेटा बुटिक कलेक्शन बघावयास गेलोत. या ठिकाणी काही स्त्रिया विविध रंगाच्या धाग्यांनी साड्या डिझाईन करीत होत्या. तर काही स्त्रीया पेन्टिंग करीत होत्या.पहिल्या मजल्यावर विविध कापडाचे प्रकार विक्री करीता ठेवले होते तर दुसर्या माळायावर आर्ट गॅलरी होती. येथे कलर पोस्टर्स, बोर्ड वर चित्र, विविध कॅनव्हास पेन्टिंग विक्री करीता होते. यानंतर आम्ही विंधु साडी आर्ट मार्केटला गेलोत. इथे अन्टीक वेगळ्या लेडीज ज्वेलरी, बॅग, मूर्ती, तसेच घराकरीता शोभिवंत वस्तू होत्या. मी येथील हॅगिंग वाल पिस, ब्रेसलेट, गळ्यातील माळ,कल्चर खरेदी केलेत. येथील बाहेरील पुतळ्याजवळ फोटो काढलेत.
“ग्रॅन्ड पन्क सारी” येथील चिंतामणी हाॅटेल मध्ये दुपारचे वेज ,नाॅन्व्हेज जेवण सर्वाचे आटोपले हाॅटेलच्या जवळच 1990 ला ज्वालामुखी झाला आणि त्यामुळेच अजुनही या हाॅटेलला तीन माळे आहेत. तिसऱ्या मजल्यावरून हाॅटेलच्या बाजूलाच सुंदर टेकडी मधून ज्वालामुखीचा धूर सौम्य स्वरूपात दिसतो. त्यांचा मानवावर विशेष फरक पडत नाही. कारण तिसऱ्या माळ्यावरून ज्वालामुखी जवळ जरी भासत असले तरी ते लांब आहे. सायंकाळी माॅल मध्ये सर्वानी शाॅपिंग केली. रात्री स्वीस बेल हाॅटेल मध्ये परतलोत. (क्रमशः)
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
========



