काव्ययोग संस्थेतर्फे – ‘चला मुलांना बोलकं करूया ‘ विशेष उपक्रम
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
काव्ययोग संस्थेतर्फे – ‘चला मुलांना बोलकं करूया ‘ विशेष उपक्रम
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
पुणे: दि. 11 मे 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता काव्ययोग संस्थेतर्फे ‘सेवाव्रत फाउंडेशन’ म्हाडाकॉलनी, वारजे,पुणे येथे लहान मुलांसाठी गप्पा,गोष्टी, गाणी आणि मजा- मस्ती इत्यादी उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन काव्ययोग संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष योगेश हरणे, गौरव पुंडे, श्रेया, प्रशिक यांनी केले. या दिवशी खास म्हणजे गौरव पुंडेचा वाढदिवस होता. हा काव्ययोग संस्थेचा उपाध्यक्ष आहे.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती सौ. वसुधा वैभव नाईक यांची होती. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर्णिका उर्फ सारिका सासवडे व श्रीराम घडे हे होते. या कार्यक्रमासाठी मयुरी, श्रीनिवास तेलंग, सेवाग्राम फाउंडेशनचे प्रदीप सर इत्यादी हजर होते. सर्व बालके गाणी, गोष्टी,उपक्रम यात रममाण झाले होते. आम्ही मुलांना खाऊ दिला. शैक्षणिक साहित्य दिले. मुले खूप खुश होती.
गौरव, श्रेया आणि प्रशिक या सर्वांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. या दिवशी जागतिक मातृदिन असल्याने आई या विषयावर ऍक्टिव्हिटी घेतली गेली. मुलांनी सुरेख उत्तर दिली. सर्वात शेवटी चाललेल्या कार्यक्रमावरच विविध प्रश्न विचारून मुलांना बोलते केले आणि ज्या मुलाने योग्य उत्तर दिले त्या मुलांना गिफ्ट देण्यात आले. ‘चला मुलांना बोलकं करूया’ या उपक्रमांतर्गत मुले छान बोलती झाली. उपक्रम उत्तम साजरा झाला.
वसुधा वैभव नाईक,पुणे



