Breaking
परीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

पर्यावरण संरक्षण ही मानवी मुलभूत गरज

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड

0 4 8 2 9 0

पर्यावरण संरक्षण ही मानवी मुलभूत गरज

‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें ! पक्षीही सुस्वरे आळवितीं १६ व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी वृक्ष, वेली, पक्षी, प्राणी अर्थातच पर्यावरणाचे महत्त्व आपल्या अभंगातून आपणास सांगितले आहे. जागतिक पर्यावरण दिवस ५ जून सर्वत्र साजरा केला जातो. १९७२ साली संयुक्त राष्ट्र संघाने प्रकृतीला अर्थातच पृथ्वी या ग्रहाचे प्रभावित करणाऱ्या घटकांपासून संरक्षण म्हणजेच जलवायू परिवर्तन, वृक्षतोड, प्रदूषण अशा विविध समस्यांपासून प्रकृतीला वाचवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले.अनेक गैर सरकारी संस्था, व्यवसाय,सरकारी संस्थांद्वारे हा दिवस समर्थित आहे. १५० च्या वर देशांमध्ये हा दिवस साजरा करून पर्यावरण व्यवस्थापनासाठी प्रयत्न केला जातो.

“पर्यावरण ” म्हणजेच चहूबाजूंनी आवरण हा शब्द थॉमस कार्लाईलने १८२८ मध्ये प्रचलित केला. पर्यावरण हा शब्द फ्रांसीस शब्द -एनवायरन म्हणजे घेरलेले या शब्दापासून घेतला गेला. पहिले पर्यावरण आंदोलन १८७० मध्ये ब्रिटेन मध्ये औद्योगिकिकरण व शहरीकरणांमुळे पाणी व वायू प्रदूषण यामुळे झाले. २०२४ ची आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाची थीम…”जमीन पुनर्संचयित करणे,वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता” ही असून यजमान देश-‘ सौदी अरेबिया ‘ हा आहे. युएन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन नुसार ग्रहाच्या ४०% पर्यंत जमीन खराब झाली असून थेट परिणाम जगाच्या निम्म्या लोकसंख्येवर होतो आहे.

आपल्या भारत देशात पर्यावरण विभाग १९८५ मध्ये स्थापन करण्यात आला तर १९८६ मध्ये पर्यावरण (संरक्षण) अधिनियम बनवण्यात आला. औद्योगिकीकरण वाढले परिणामतः पर्यावरणाचा ऱ्हास झाला. भारत आणि पर्यावरण यांचा जर विचार केला तर भारत प्राचीन काळापासून निसर्ग पूजक आहे.

विश्वताप मिट जाए हर जन मन गदगद!
धरती पर त्रिदेव है नीम पिपल और बरगद!!

पिंपळाला ‘वृक्षराज’ म्हटले जाते. कारण, पिंपळ १००% कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि पानांची देठे नाजूक असल्यामुळे शांत वातावरणातही ते हालत राहतात आणि शुद्ध ऑक्सिजन पुरवत राहतात. भारताला प्रदूषण मुक्त करायचे असेल वसुंधरेचे संरक्षण करायची मानवा तुझी इच्छा असेल तर एक लक्षात घे.. वेळ खूप कमी आहे. कारण, जागतिक सरासरी तापमानाचा आलेख वाढतच जात असल्याचे आपण अनुभवले आणि परिणामी उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे. भयानक स्थिती निर्माण झाली आहे हे गांभीर्य ओळखून हालचाल होणे आवश्यक आहे. कारण ५-६ वर्षे पाऊस पडेल या स्थितीत.इतक्याच मर्यादित वेळेत वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन होणे आवश्यक आहे.

सध्या माणसातला माणूस हरवत चालला आहे. स्वत्व शोधण्यासाठी, मनाचा मनाशी संवाद होण्यासाठी, मी कोण, हा जन्म का या व अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तसेच शांत प्रदूषण मुक्त, रोग मुक्त जीवन जगण्यासाठी जीवनदायी वृक्षलागवड होणे ही मानवा तुझी मुलभूत गरज बनली आहे. तुझी गरज ओळखून कामाला लाग. बस इतकेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त…!!

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
=================

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे