0
4
8
2
8
4
युग
बदलले युग सारे
नवे पर्व सुरु झाले
पण माणुसकी मात्र
कसे विसरूनी गेले.
पैसा हाती येत गेला
अहंकार आड आला
अशा स्वार्थी मानवाला
नवा हा रोग जडला.
सुखसोई महालात
किती जरी मिळणार
चिंता मनी सदा त्यासी
छळतच राहणार .
संत विचारांचे धन
साठा किती भरपूर
प्रेमभाव अंगीकारा
राहू नका दुरदुर .
दोन शब्द प्रेमाचेच
गोड सर्वांनी बोलावे
भेदभाव हेवेदावे
सारे बाजुला ठेवावे .
माणुसकी वृक्षवेली
घरोघरी ती लावावी
स्नेहरुपी सुगंधाने
सदा बहरून यावी .
दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
0
4
8
2
8
4



