बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, आवासचे सामूहिक नृत्य स्पर्धेत सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्यु. कॉलेज, आवासचे सामूहिक नृत्य स्पर्धेत सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
अलिबाग: (दि १२ जाने): दि. ८ जानेवारी २०२६ गुरूवार रोजी कनकेश्वर फाटा, चोंढी येथे लायन्स क्लब ऑफ अलिबाग-मांडवा आयोजित लायन्स किहीम फेस्टिव्हल मध्ये शालेय सामुहीक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या विद्यार्थीनींच्या एका गटाने आमच्या बायांनी छंद घेतला या कोळी गीतावर केलेल्या सामूहिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आणि प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच विद्यार्थीनींच्या दुसऱ्या गटाने मंगळागौर हे सामूहिक नृत्य अतिशय सुंदररित्या सादर केले. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या नृत्यकलेला दिलेली दाद आणि कौतुकाचा वर्षाव अविस्मरणीय ठरला. या यशामुळे विद्यालयाचा नावलौकिक अधिकच वाढला आहे.
आयोजकांच्या वतीने आमच्या बायांनी छंद घेतला या कोळीगीतावर नृत्य करून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थीनींच्या गटाला ७००० रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्रे व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सुहास काशिनाथ राणे यांनी कार्यक्रम स्थळी १००० रु. रोख रक्कम बक्षीस दिले. सहभागी विद्यार्थीनींच्या गटाला आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रम स्थळी विद्यार्थीनींना घेऊन जाणे, तेथे रात्री उशीरा पर्यंत विद्यार्थीनीं बरोबर थांबून त्यांना प्रोत्साहीत करणे यासाठी स्वतः मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सहाय्यक शिक्षक सचिन भंडारे सर व अजित नाईक सर यांनी मोलाचे योगदान दिले.
सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकारिणी सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



