0
4
8
2
9
3
हरवलेलं गावपण
पूर्वी माणूस असा असायचा
बोलतांना मनसोक्त हसायचा
आता मात्र काळाच बदललं रूप
बोलणारी माणसं झाली चूप
जपायची निखळ नातीगोती
घडत जायच्या प्रेमळ सोबती
एकत्र कुटुंबात असायच आनंद
तिथेच असायचा आपुलकीचा गंध
शहरापेक्षा गावाला होत महत्व
तिथेच मिळतसे पोषण तत्व
ओळखीची माणसं जवळीकतेच नातं
प्रत्येक जन हक्काने जवळ येतं
गाईगुरांचा मेळा गवताचा चारा
जन्म गाव असे सर्वापरी प्यारा
शोभून दिसे पार अन् चावडीच रूप
काय होईल भविष्यात गावच स्वरूप
जगदंबे विलास
सहशिक्षक गुजराती हायस्कूल,नांदेड
0
4
8
2
9
3



