0
4
8
2
9
4
तुझी आठवण येते
तुझी आठवण येते
कंठ दाटून येतो
या हुंदक्याने माझा
पापणकाठ ओलावतो
किती झाल्यात भेटी
घेतल्या आणाभाका
क्षणात संपले सारे
कुठे चालली नौका
आलीस आयुष्यात माझ्या
आशेचा घेऊन किरण
चुकले काय माझे
तू घेतले हे वळण
सोबत करीन आयुष्यभर
तू म्हणालीस कितिदा
घाव घातला काळजात
काय झाला तो वायदा
सल ठेऊन उराशी
अशी गेलीस तू निघून
आठवणींची भेट देऊन
स्वप्ने आसवांत भिजून
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
9
4



