0
4
8
2
8
6
बहर नवा
शिशिराची पानगळ
तरू उदास उदास…
ओल्या पालवीचा
काटक्यांना ध्यास
क्रूर नजर पांथस्थांची
हेटाळणीचे शब्दबोल
वठलेल्या तरूखाली
कोण उभं आता राहिल ?
बोलले तरूवर तत्क्षणी
तरूवराची माझी जात
नाही खचणार कधी…
बहर नवा लेवून अंगी
डुलणार या रानामधी
बघ माणसा तूच आता
विचार कर जरा तरी…
उदासलं मन तुझं कधी
सांग का जातो फासावरी…?
वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
======÷÷=
0
4
8
2
8
6



