0
4
8
2
9
0
तिळगुळ
तिळगुळ देतानाच कसं
बोलतात माणसं गोड गोड
डोक्यात खुळं शिरल्यावाणी
उगीच का करतात तोड फोड
मकरसंक्रातीच्या सणालाच
कशाला बोलताय गोड गोड
मानवी मनात पेरण्या विष
शब्दांची करू नका मोड तोड
नैतिक मूल्यांचा होतोय -हास
सदाचारी माणसांना होतो त्रास
साखरेचा फुगा ठेऊन मुखात
आत्मानंद मिळवा पर सुखात
अमानुष रोज होतात कसे हल्ले
कोण कशाला देतील मग सल्ले
अंतीम समयी जीवनाची किंमत
कळते तेव्हा अंगात नसते हिंमत
तिळगुळापुरता नकोय गोडवा
एकजुटीन मनाची कोडी सोडवा
टाकूच नका कोड्यात कुणाला
कुणाचं चुकतंय विचारा मनाला
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=======
0
4
8
2
9
0



