Breaking
ई-पेपरकवितागडचिरोलीविदर्भसाहित्यगंध

फक्त तू खचू नकोस….

सौ. अर्चना राजू ईंकने

0 4 8 2 9 0

फक्त तू खचू नकोस….

अपयशाच्या काळामध्ये
नैराश्याच्या नसावा थारा
मनाने खचून न जाता
व्हावे शितल शांत झरा

स्वप्न साकार करण्यासाठी
संकटावर कर तू वार
झाशीची राणी बनूनी
न डगमगता ध्येय कर पार

आयुष्याच्या वाटेवरती
येती सुख दुःखाची लाट
काढ पोखरून मार्ग यशाचा
निखाऱ्यातूनही फुलेल वाट

घेऊन डोळ्यात स्वप्नांना
सोबत आपण चालायचं
बळ मजबूत हातात आहे
प्रयत्नांवर विजय मिळवायचं

नवी पहाट उगवण्यासाठी
तेवत ठेवावी ज्ञानज्योत
गरुड भरारी घेऊनी आकाशात
यशस्वी किर्तीवंत हो जीवनात.

सौ. अर्चना राजू ईंकने
आरमोरी जि.गडचिरोली
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे