‘पंख पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन आज; पत्रकारांचाही होणार सत्कार
निमंत्रित कवींना कवी संमेलनांचे आमंत्रण

‘पंख पैंजण’ कथासंग्रहाचे प्रकाशन आज; पत्रकारांचाही होणार सत्कार
निमंत्रित कवींना कवी संमेलनांचे आमंत्रण
नागपूर: मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे आज (दि २३) रोजी दुपारी ३.०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड नागपूर येथे शहरातील प्रसिद्ध कथाकार, लेखिका व कवयित्री कुसुमलता वाकडे यांच्या ‘पंख पैंजण’ या कथा संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या प्रकाशन समारंभास अध्यक्षा सविता धमगाये, प्रमुख मार्गदर्शक डॉ अनिल पावशेकर, मा रत्नाकर तिडके, मा नितेश क्षीरसागर, आदिती सिरसीकर व बी एस फोर न्यूजचे संपादक सूरज भिलकर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमात नागपूर शहरातील निवडक पत्रकारांना बिनधास्त न्यूज व बी एस फोर न्यूज तर्फे सन्मानित करण्यात येणार असून, निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे आयोजनही याप्रसंगी करण्यात आले आहे. शहरातील काव्यरसिक व लेखकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे





