Breaking
ई-पेपरकवितापरभणीसाहित्यगंध

पाईक संविधानाचे

बी एस गायकवाड पालम,परभणी

0 4 8 2 8 4

पाईक संविधानाचे

दिले मूलभूत हक्काधिकार
उपकार आहेत बा’भीमाचे,
जतन करावे संविधानाला
होऊन पाईक संविधानाचे…
पशुतुल्य जीवन जगतांना
सोसिले कैक दुःख यातना,
मानवतेचा पाया रचला तो
जाणून संविधान लिहिताना…
अथक परिश्रमाने लिहिलंय
संविधान माझ्या बा’भीमाने,
लोकशाहीची जपणूक करा
पाईक संविधानाचे जोमाने…
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी
संविधान अर्पिले भारताला,
एक मताचा अधिकार दिला
सारखाच देशाच्या जनलेला…
सर्व सामान्य माणूस जातोय
सर्वोच्च पदी नियुक्ती होऊन,
समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता
दिले हक्क संविधान लिहून…
जागे व्हा रे संघटित होऊन
करण्या जागर संविधानाचा,
पाईक संविधानाचे सर्वजण
धागा पकडून लोकशाहीचा…

बी एस गायकवाड
पालम,परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे