इंडोनेशिया बाली प्रवास — भाग 5
कुसुमलता दिलीप वाकडे
इंडोनेशिया बाली प्रवास — भाग 5
दिनांक 13 ऑगस्ट 2024 ला आमचा संपूर्ण ग्रुप आंघोळ, नाश्ता, तयार होऊन आम्ही ऊलान गुल्ला टेम्पल या मंदिरात गेलोत हे मंदिर 1600 शतकातील असून समुद्राच्या मध्यभागी आहे. मोठ मोठया लाटा मंदिरातील दगडाला आदळतात. दुपार बारा नंतर समुद्राला जास्त भरती येते. म्हणून इथे जास्त वेळ न थांबता भक्तगण वर दगडावर चढतात.हा प्रशांत महासागर आहे.लाटा ओसाळल्या कि भक्तगण पुन्हा मंदिराकडे येतात.या परिसरात वरच्या भागाला कपडयांची दुकाने होती मी व मंजु मैत्रिणीने इथे ड्रेस घेतलेत. समुद्रात भरपूर फोटो काढलेत. त्यानंतर आम्ही ‘बेडगुल लेक हाॅटेल’ येथे फाॅरेन्स तसेच इतरही व्यक्ती जेवणाकरीता येतात.भरपूर गर्दी होती.खूप चविष्ट पदार्थ व जेवण सुंदरअसुन सेल्फ सर्विस असते. ‘उल्लून धानू बिअरटन टेम्पल गार्डन’ हे बुद्धिस्ट टेम्पल आहे इथे सुंदर सुंदर वेगवेगळया फुलाचे प्रकार आहेत व आजुबाजुला तलाव आहेत गुलाबी,जांभळी,लाल,पांढरेशुभ्र फुले आहेत हे टेम्पल जमिनीपासून 1800 मिटर उंचावर आहे. तलावाच्या पुढे, मोर असलेल्या स्टचू पुढे, गार्डन मध्ये फोटो काढलेत. एका गोलाकार वर्तुळात इंडोनेशियाचा फ्लॅग आहे.
दिनांक 14 ऑगस्ट 2024 ला पहाटे 6 वाजता आयोजकांनी सर्वान करीता नाश्ता पॅक करून सोबत दिला. माला माल एक्सप्रेस बोटनी केलंनकिंग बीच, ब्रोकन बीच, क्रिस्टल बीच हे तीन बीच बघण्याकरीता बाली ला निघालोत. या बोटीतून जाताना अथांग समुद्रात पाण्याच्या लाटा बोटीवर आदळत होत्या.तो पाण्याचा प्रवाह बघुन मनात शंका व भिती वाटत होती.बालीच्या पलीकडील बेटावर पोहचताच तेथील कार प्रत्येकी 5 माणसे एका गाडीत याप्रमाणे सहा कारमध्ये बसलोत.या बेटावर तीन बीच आहेत प्रथम ‘केलंनकिंग बीच’ इथे बरेच लोक संपूर्ण शरीर टॅटू काढतात. या पोरबंदरवरून 30 किमी अंतरावर आम्ही सहा गाडीने पोहचलोत.या बीचचे पाणी निळसर व आम्ही उंचावर होतो.खाली बीचचे निसर्गरम्य सौंदर्य डोळयाचे पापण्यांची हालचाल करू देत नव्हते.ड्रायवरनी झाडावर चढून गुप्र फोटो काढलेत. पुढे झुडपातून खोलवर टेकडीसारखी जागा चालत गेलोत.पुढे जाऊन एका व्हयू पाईटवर म्हणजेच आम्ही उंचावर व खाली निळसर बीच थोडे जरी संतुलन गेले की सरळ मरणाच्या खाईत, कुणी चुकून पडू नयेत म्हणून उंचावरील किनार्यावर झाडाच्या फांदया ठेवल्या आहेत.
यानंतर आम्ही ‘ब्रोकन बीच’ करीता निघालोत या बीचवर तेच ड्रायवर तीच गाडी हे अंतर एक तास वीस मिनिटांचे होते.येथील हाॅटेलवर जेवणाची छान व्यवस्था होती. सुंदर परिसरात बीचवर आम्ही सर्वानी फोटो काढलेत. यानंतर आम्ही क्रिस्टल बीचवर पोहचलोत या बीचवरील रेती चकाकणारी होती येथे फाॅरेन्स लोकांची चहलपहल असते ते पाण्यात खेळतात, रेतीवर निपचित पडलेले असतात. आम्ही सर्वानी बीचवरील पाण्यात बसून,तसेच किनार्यावर, दगडावर आनंद घेतला. फोटो काढलेत. दिनांक 15 ऑगस्ट 2024 ला स्वीस बेल हाॅटेलच्या बाहेर 15 ऑगस्ट असल्यामुळे आम्ही सर्व तीन रांगेत उभे झालेत राहूल नी ऑर्डर दिला व सर्वीनी सामुहिक राष्ट्रगीत म्हटले. बसमध्ये बसलोत शेवटच्या हिबो बसनी आमचे व्हीजेई एअरकाॅम विमान 1.30 चे असल्यामुळे परतीचा प्रवास सुरू झाला.
विमानतळावर एका प्रसंगाला तोंड द्यावे लागले. इंडोनेशिया ते हनोई विमानतळावर सुखरूप पोहचलोत पण आयोजक राज नी कनेक्टिंग फ्लाईट लगी है म्हणून माझ्या पतीला पुढे पाठविलेत गुप्रचे संपूर्ण लोक बोर्डिंग पास करीता रांगेत उभे होते पण माझे पती न दिसल्यामुळे मी घाबरले मी व माझा भाऊ राहुल यांनी संपुर्ण विमानतळावरील रांगा पळताडून बघितल्या नंतर परत फ्लाईट जिकडे आम्हास उतरवून थांबली होती तिकडे गेलोत आता तिकडील दरवाजे बंद झालेले होते.सिक्युरिटी ऑफिसरला प्रॉब्लेम सांगितला इंग्रजीतच बोलावे लागायचे मी म्हटले ” माय मिस्टर इज मिसीग ” ते म्हणालेत ” यु फस्ट चेक ,ऑफ्टर साॅल युअर प्राब्लेम ” थोडया वेळानंतर आमच्या शेजारील वावरे साहेब माझ्याकडे येऊन म्हणलेत वाकडे साहेबानी चेक करून बोर्डिंग पास घेऊन ते विमान जिथे येणार त्या गेट कडे सिटवर बसलेले आहेत तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला एकदाचा सुटकेचा श्वास सोडला.
हे विमान हनोई ते अहमदाबाद होते. आता आम्ही भारतीय विमानतळ अहमदाबाद ला पोहचलोत. आंतरराष्ट्रीय अहमदाबाद विमानतळावरूनच थोडे अंतर ट्रॉली बॅग ओढत त्या साईडला डोम्यास्टीक विमानतळ होते. पुन्हा सर्वाचे पासपोर्ट चेकिंग करण्यात आली.पहाटे 5.50 चे इंडिगो विमान नागपूर ला सकाळी 7 वाजता पोहचले. प्रत्येकांनी स्वतःची गाडी तर कुणी कॅब केली सर्वानी परतीचा निरोप घेतला. असा माझा हा इंडोनेशिया बाली दुसरा विदेशी प्रवास होय. या पूर्वी 2022 ला माझा थांयलड प्रवास झालेला आहे. हे सर्व आनंदाचे क्षण टिपून असतात. ( समाप्त )
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर



