
0
4
8
2
8
4
चंद्रमास
वखवखलेल्या नजरा
झेलत झाले मोठी मी,
भीती अन, न्यूनतेच्या
आगीत जळते नित्य मी.
काळ्याकुट्ट अंधाराची
लावली,परिस्थितीनें सवय,
दूरच बरी मी, उजेडापासून
अब्रूला सांभाळते मी नित्य.
चेहरा बांधून जाते
नौकरी उद्योगास मी,
चारचौघात वागते
दबूनदबून भिवून मी.
घेतांना,स्वातंत्र्याचा आस्वाद
सोबत देतो हा, चंद्रमास
माझे मलाच,विसरून जाते
असे निळ्यानभीची आस.
कसा ठेवू,विश्वास कोणावर?
सारेच,टपलेत लचके तोडायला
माझ्या सावलीस घाबरते मी
करेल का कोणी अघटित वार.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
0
4
8
2
8
4



