Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

लेकरू ‘ते’ मेंढपाळाचं…!!!

कुसुमलता दिलीप वाकडे

0 4 8 2 9 4

लेकरू ‘ते’ मेंढपाळाचं…!!!

पायात फाटक्या चपला वडिलाच्या सोबत सोबत असताना मेंढ्या चारायला जायचं, कधी कधी तर आई कापडात गुंडाळून भाकरी बांधून दिली, तर स्वारी मेंढयासोबत एकटीच निघायची. होय मी सांगत आहे ते म्हणजे 2024 मध्ये UPSC नागरीक सेवा पूर्व परीक्षेमध्ये 551वा रॅक घेऊन उत्तीर्ण झालेला बिरदेव सिध्दाप्पा डोणे, राहणार यमगे, तहसील कागल, जिल्हा कोल्हापूर या मेंढपाळाच्या मुलांचे प्राथमिक शिक्षण 1ते 7 गावातील जिल्हा परिषद केंद्रशाळा यमगे येथे तर माध्यमिक शिक्षण सुध्दा यमगे गावातच झाले. घरात कसलीच सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण दुरची गोष्ट. घर म्हणजे दोन रूमची खोली. घरी जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा व्हरांडा म्हणजेच अभ्यासाची खोली, बिरदेवचं बालपण डोंगरदऱ्यामध्ये मेंढया चारत, कधी उघडयावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. काही तरी मोठं करायचं स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाटावा असं काहीतरी घडवायचं असे स्वप्न त्याने उराशी बाळगलं .

दहावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने आय.पी.एस. होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते.त्यावेळेस शाळेला शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे अभिनंदन पत्र बिरसेन करीता आले होते; पण आतापर्यंत या शाळेला असले भारी पत्र कुणीच पाठविले नसल्यामुळे ते पत्र मुख्याध्यापकांनी शाळेच्या फाईल करीता ठेवले व बिरदेवला त्यांची रंगीत प्रत दिली.

‘बिरदेव’ यांनी बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत 89 टक्के गुण मिळवून मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता. वडिल सिध्दाप्पा यांची आर्मीत जाण्याची इच्छा. पण परिस्थिती व बारावी पर्यंत शिक्षण यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ती वडिलांची इच्छा बिरदेवचे मोठे बंधू यांनी स्वतः आर्मीत भरती होऊन पूर्ण केली. त्यानंतर बिरदेव यांनी पुणे येथे सी.ओ.इ.पी.येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. सुरवातीपासून स्पर्धा परीक्षेचे वेड असल्याने 2021 मध्ये UPSC च्या क्लासेस करीता दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. पण आर्थिक पाठबळ नसल्यामुळे पुणे येथील मंगळवाडाचा मित्र जय पाटील यांचे आजोबा बी.टी.पाटील कुठल्या संस्थेत प्राचार्य होते त्यांचा पुण्यातील विद्यार्थी अजित शहा यांनी बिरदेवला एकाच फोनवर बिरदेवच्या खात्यावर दोन लाख पसत्तीस हजार रक्कम पाठविली.

2021 मध्ये दिल्लीत क्लासेस जाईंन करून 2022 मध्ये पहिली परीक्षा दिल्लीतच दिली पण तो क्लिअर झाला नाही. बिरदेव तिथेच मेन्सकरीता थांबला. नंतर पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी सेंटर मध्ये अभ्यासिकेला आलेत इथे सुध्दा सहज प्रवेश मिळत नाही ते म्हणतात माझे भाग्य चांगले मला या अकाडमी मध्ये प्रवेश मिळाला.2023 मध्ये प्री दिली, दुसर्‍या प्रयत्नात मी यशस्वी होऊ शकलो नाही पण 2024 मध्ये झालेल्या UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये 551 वा रॅक घेऊन ही परीक्षा क्लिअर केली. बिरदेव उत्तीर्ण झालेत.

बिरदेव सांगतात 7 वीत असताना शाळेतील जाधव मॅडम म्हणायंच्या तू शिक्षणाधिकारी हो आम्ही तुला भेटावयास आला की अभिमान वाटेल. 11 वी 12 वी मध्ये गेल्यावर उपजिल्हाधिकारी मोठी पोस्ट असते त्याचे हाताखाली भरपूर शिक्षणधिकारी असतात पुण्यातील इंजिनरिंग कॉलेज सी.ओ.ई.पी. मध्ये प्रवेश घेतला तेव्हा याच काॅलेजचे 2017-18 मधील बॅचचे एकाच वर्षी 15-17 विद्यार्थी UPSC च्या फायनल लिस्ट मध्ये आलीत. माझ्यापेक्षा काही मुलांना सीआयपीए कमी होता ती फायनल लिस्ट मध्ये येऊ शकतात तर मी का बरं येणार नाही ही जिद्द. बारामतीचा मित्र तसाच जीव लावणारा भाऊ अक्षय सोळणकर प्रत्येक महिन्याला पाच सहा हजार मला द्यायचा त्याच्या पत्नी म्हणजेच एश्वर्या वहिनी मला न सांगता पैसे पाठवायच्या आणि सांगलीला त्याच्या फ्लाॅटवर येणार म्हटलं, की येताना कपडे धुण्याकरीता सोबत घेऊन यायला सांगायच्या चांगले मित्र व मदतनीचा हातात मिळत गेला.

बिरदेव म्हणतात सुरवातीपासून इंग्लिशचे मराठीत भाषांतर करून घ्यायचो, नंतर इंग्लिश टु इंग्लिश वाचन 2021 पासून पूर्ण वेळ प्रिपेशन करायचा विचार केला. ते म्हणतात तुम्ही फार्म मध्ये जे टाकलं त्याच्या बेसीक गोष्टी माहीत असणे आवश्यक असते. 22 एप्रिल 2025 ला दुपारी 2 वाजता निकाल लागला तेव्हा मामाच्या गावाकडे कर्नाटक मधील बेलगावला काकाकडे मेंढ्याचे केस कात्रण व मेंढ्यासोबतच होतो. अभिनंदनचा वर्षांव होत होता. दररोज तिनशे फोन सत्कार झालेत. तेव्हा मी म्हटलं मला बुके नकोत बुकं द्या.

तेव्हा माझ्या गावात मुंबईचे मोठे नेते शिखर पहाडिया यांनी एक हजार पुस्तके गाडीने पाठविलेत. त्यात एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, प्रेरणादी, शैक्षणिक, अभ्यासातील स्पर्धा पुस्तके आहेत. ज्या गोष्टी करीता मला त्रास झाला ती माझ्या बांधवाना होऊ नये, गावात ग्रंथालय उभारणार. कागल तालुक्यातील पहिला आय.पी.एस.अधिकारी होण्याचा मान एका मेंढपाळ्याच्या मुलाने अभ्यासाच्या जोरावर करून दाखविला. आपल्या कर्तृत्वास सलाम बिरदेव साहेबजी !

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे