Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्रमुंबई

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व जुनियर कॉलेज,आवास मध्ये महावाचन उत्सव – २०२४ उपक्रम उत्साहात

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 9 4

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व जुनियर कॉलेज,आवास मध्ये महावाचन उत्सव – २०२४ उपक्रम उत्साहात

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

अलिबाग: महाराष्ट्र सरकारने समग्र शिक्षा मोहिमे अंतर्गत वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून दि. १६ अॉगस्ट २०२४ ते ३१ अॉगस्ट २०२४ या कालावधीत महावाचन उत्सव -२०२४ उपक्रम राबविण्याचे पत्राद्वारे राज्यातील सर्व शाळांना कळविले होते.

त्यानुसार आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून तसेच सर्व शिक्षकाच्या, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून गुरुवार दि. २२ अॉगस्ट २०२४ या दिवशी महावाचन उत्सव -२०२४ हा उपक्रम इ. ५ वी, इ. ६ वी ते इ.८ वी, इ. ९ वी ते इ.१२ वी या तीन गटात राबविण्यात आला.

या अनुषंगाने प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेच्या पुस्तकातील दर्जेदार चरित्र, कथा, कादंबरी, कविता इत्यादींचे वाचन करून घेण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे