Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

कामगार

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 5 5 8 5 8

कामगार

माझ्या नारायण सुर्व्याचा
वसा मी सोडणार नाय
कामगार झालोय म्हणूनच
थोडा गुन्हा घडणार हाय… //

औद्योगिक प्रगतीचा
मीच खरा शिल्पकार
बारा महिने चोवीस तास
अहोरात्र राब राबणार
घामाचा प्रत्येक थेंबाचा
मोबदला मागणार हाय…. //

झालोय आंम्ही ज्ञानवंत
अज्ञानाची कात टाकून
हक्क, अधिकार, कर्तव्य
बर्‍यापैकी घेतली शिकून
शोषित, वंचित उपेक्षितांचा
आवाज बुलंद होणार हाय… //

शिका आणि संघटित व्हा
एकजूटिनेच संघर्ष करा
बाबासाहेबांचा हाच मंत्र
आचरणात आणूच खरा
अन्याय सहन करणारे
लाचार मुर्दाड राहणार नाय… //

संघटित आणि असंघटित
येथे जरी हजारो झेंडे नेते
कामगार विरोधी ध्येय धोरणे
आंम्ही हाणून पाडू एकजूटिने
अस्तित्वाची आरपार लढाई
आता त्वेषाने लढणार हाय… //

शासन मालक मिली भगत
उघडा पाडू चेहरा खोटा खरा
अन् घरभेद्यांनाही वेचून काढू
त्यांचे फाडू बुरखे टरा टरा
दूध का दूध पाणी का पाणी
याच नितीने वागणार हाय
कामगार झालोय म्हणूनच
थोडा गुन्हा घडणार हाय… //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 8 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे