“आभाराची शब्दसुमनांजली”; मृदुला कांबळे
तुलना मानवाचे सर्वात मोठे शत्रू

“आभाराची शब्दसुमनांजली”; मृदुला कांबळे
तुलना मानवाचे सर्वात मोठे शत्रू
आकाशात सूर्य उगवतीला
सोनेरी किरणा धुक्यात रंग भरते.
थंडीची मरगळ झटकून जादुई संदेशाने
मनात उत्सुकता अन् नवचैतन्य पसरते..
खरंच असं होतं दादांचा जादूई संदेश जेंव्हा अचानक मोबाईलवर दिसतो. मनात उत्सुकता आणि आनंद. कोणत्या काव्यसमूहात आपलं पोस्टर झळकते. हे क्षण थोडे आंनदी. थोडे औत्सुक्य वाढवणारे.. मनाचा आत्मविश्वास द्विगुणित करून लिखाणाला क्षितीजाकडे नेणारे..!
काल खरंतर मी चित्र चारोळी नेहमीप्रमाणे लिहिणार नव्हते. पण जरा डोकावून बघावं समूहात म्हणून सहज मी ते चित्र ओपन करून बघितले आणि मला त्या दोन
चेहरे दिसले एक जीर्ण,रंजल्या गांजल्या सारखा आणि दुसरा अगदी विपरीत सौंदर्य ,सौष्ठव, श्रीमंत जितके जगी सुख ते सारे त्या हरित मुखाचा पायी लोटांगण घालित आहे.असं वाटलं.मग विषय पाहिला तुलना खरंच किती योग्य विषय एकीकडे विरोधाभास आणि दुसरीकडे तुलना खरंच अप्रतिम विषय अन् मग माझी लेखणी थांबेल तरी कशी आधी मी त्यात विरोधाभास बघतं होते पण आता मला तुलनात्मक रुपाने बघायचे होते.
खरं तर मला कोणाची कोणाशी तुलना करायला कधीच आवडतं
नाही. ना रूपाची तुलना ना गुणांची
देवाने प्रत्येकाला व्यक्तिमत्त्वा प्रमाणे
सर्व काही दिलेलं आहे.त्यामुळे तुलना हे योग्य नाहीच.. माझा मुलगा लहान असताना ही कधी त्याला असं म्हटलं नाही की तो कसा बघ,किंवा कसा अभ्यास करतो बघ.कारण असं करणारे पालक आपल्या मुलांचे मानसिक खच्चीकरण करतं असतात..
अरे,देवा क्षमस्व मी पुनःविषयावर येते..हं..तर तुलना माणसांची वृत्ती अशीच असते ह्या चित्रासारखी फक्त स्वतःची तुलना इतरांशी करायची हौस.. आणि जिथे स्वतःची बाजू लुळी असेल ते सोडून देऊन इतरांना शहाणपणचा मोफत सल्ला देतं राहणे..मी तर अशी बाई, माझा तर असं असतं….पण आपण हे विसरतो की समोरच्याच्या ज्या स्थितीशी आपण तुलना करतोय ते दुःख संकट आपल्यावर ही येऊ शकत.ह्याची जाणिव तुलना करणारे ठेवतच नाही..मला तर वाटतं तुलना हाच सर्वात मोठा मानवीय शत्रू कारण त्याचा मुळे अहंकार ह्या भावनेचा मनात जन्म होतो… किती ही तुलना केली इतरांना निम्न,आणि स्वतःला कितीही उच्च समजले तरी शेवटी ह्या देहाचे एक दिवस खोड होणारच आणि ते भडाग्नीचा होमात जळून तिथे आपल्या देहरुपी पसायदानाची पूर्णाहुती होणार…
नको गर्व नको कोणाशी तुलना
प्रत्येकाचे भोग,प्रारब्ध नी भावना..
देवाने दिले आपणांस रूप,गुण तर
त्यांचा मिजास दाखवू नका इतरांना..
कधी जर भाग्य पालटले तर
सोसाव्या लागतील कटुसत्याचा वेदना..
आज माझ्या चित्र चारोळीला सर्वोत्कृष्ट स्थानावर विराजमान करण्यात आले.त्याबद्दल मी
समुहाचे सर्वेसर्वा आ.राहुल दादा, आ.पल्लवीताई,आ.सविताताई,
आ. वैशालीताई, आ. तारकाताई
आ.स्वातीताई, आ.वृंदाताई आ.शर्मिलाताई, आ.सुधाताई, आ.विष्णु दादा ,आ.संग्राम दादा आ.हंसराज दादा आणि प्रशासकीय टीमचे मन:पुर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद तसेच मला शुभेच्छा आणि आशिर्वाद देणारे माझे सर्वशिलेदार बंधु भगिंनंचे ही मन:, पूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद
कवयित्री मृदुला कांबळे
गोरेगाव जि रायगड
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



