Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘एकच मिशन, जुनीच पेन्शन; प्रशांत ठाकरे

शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 7

‘एकच मिशन, जुनीच पेन्शन; प्रशांत ठाकरे

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे परीक्षण

लोकशाही व्यवस्थेचा खरा कणा म्हणजे सरकारी कर्मचारी. शासनाची धोरणे, निर्णय व कायदे केवळ कागदावर न राहता जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य प्रशासनिक यंत्रणेद्वारे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांद्वारे घडते. संपूर्ण आयुष्यभर ही लोक प्रामाणिक सेवा देतात. उत्तरार्धात पेन्शन हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असते; पण २००४ पासून या पेन्शनला कात्री लावण्याचा काम सरकारकडून सुरू आहे आर्थिक संकटाचे नाव करून ही योजना बंद करण्यात आलेली आहे. देश उभा राहतो तो केवळ धोरणांवर नाही, तर सेवेत आयुष्य झोकून देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर. त्या विश्वासाचा कणा म्हणजे, ‘जुनी पेन्शन योजना’.

आयुष्यभर “कर्तव्य प्रथम” म्हणत शिकवण देणारा शिक्षक, कायद्याचे रक्षण करणारा पोलीस, आणि प्रशासकीय यंत्रणा चालवणारा कर्मचारी निवृत्तीनंतर मात्र त्यांचे भविष्य बाजाराच्या मर्जीत सोपवले जाते. ‘सेवा निश्चित, पण निवृत्ती अनिश्चित’ ही कोणत्या न्यायाची भाषा? जुनी पेन्शन योजना म्हणजे शासनाची कृपा नव्हे, ती सेवेला दिलेली कृतज्ञतेची साक्ष होती. ती काढून घेणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वार्धक्याला असुरक्षिततेच्या दारात उभे करणे होय. आर्थिक भाराचा युक्तिवाद आकड्यांत अडकलेला आहे; पण प्रश्न माणसांचा आहे. सुरक्षित निवृत्ती म्हणजेच निश्चिंत सेवा ही गुंतवणूक आहे,खर्च नव्हे.

जीवनाच्या उत्तरार्धात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन लागू करून त्याचे भवितव्य व त्याचे जीवन सुरक्षित करणे ही काळाची गरज आहे. सर्वांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेला हा विषय आज मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेसाठी निवडला, हेतू हाच की प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळावे. मोठ्या प्रमाणात यात कवी कवयित्रींनी भाग घेतला व विषयाला साजेसे लिखाण केले आहे. तेव्हा तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद….!

प्रशांत दत्तात्रेय ठाकरे, दुधनी
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक मराठीचे शिलेदार समूह

4.7/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे