0
4
8
2
9
3
मुलांना सहलीला नेणारी बस दरीत कोसळली; १ ठार तर १५ जखमी
शहर प्रतिनिधी
नागपूर/ हिंगणा: शहरातील सरस्वती विद्यालय शंकर नगर नागपूर या शाळेची ट्रिप घेऊन जात असलेली बस आज (दि २६) हिंगणा ते सेलू मार्गांवरील हिंगणी जवळ 15 ते 20 फूट दरीत कोसळून अपघात झालेला आहे.
या अपघातात एक मुलगी दगावलेली आहे आणि 10 ते 15 मुलं मुली गंभीर जखमी झालेल्या आहे. एकूण 52 मुला मुली पैकी बाकीचे किरकोळ जखमी झालेल्या आहे. रोड सुनसान असल्याने जास्त ट्राफिक नसल्याने तेथील नागरिकांनी व 7 ते आठ लोक मिळून त्यांना ग्रामीण रुग्णालय हिंगणा इथे पाठविलेले आहे कुणाचे मुलं मुली असतील त्यांनी हिंगणा ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करावा.
0
4
8
2
9
3



