कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
सर ओली; आशा कोवे-गेडाम

0
4
8
2
9
0
सर ओली
ओल्या ऋतूत भिजली
ओलीच पाती हिरवी
स्वच्छंदी गार वारा
नवं सृष्टीचे रंग दावी…
मोहक सृजन पर्वाची
नवखी प्रवाह धारा
रोमांचित चैतन्याचा
नवखा दिसे नजारा…
चिंब चिंब तरुपर्णावर
आरास जलथेंबांची
पेरुन द्यावे वाटे चौफेर
बिदागी निसर्ग धनाची…
नसताच हा तजेला
अबोल असती अवनी
भिरभिरत्या पाखरांच्या
नसती ओठात गाणी…
मनांगणात अवतरली
अलवार ओली सर
अपरिमित रौद्रतेने
मोडू नये स्वप्नांचे घर…
आशा कोवे-गेडाम
वणी जि.यवतमाळ
0
4
8
2
9
0



