
0
5
6
8
3
2
महामानव
जिथे माणसाला माणूस
म्हणून नाकारल्या गेलं होत
तिथे स्वाभिमानाच जगणं
बा भीमाने शिकवल होत
पुस्तक हाती घेतलं होत
तेव्हा जग त्यांना हसलं
बाबासाहेब म्हणाले हसू द्या
उद्या हेच जग मला वाचेल
कामातून त्याच्या नुसती
शाई नाही झरली होती
ती कोट्यवधी मुक्यांची
दिनांची वाचा ठरली होती
जेव्हा अन्यायाची रात्र गडद होते
भीमाच्या विचाराचा सूर्य पुन्हा उगवतो
कारण महामानव कधी मरत नसतात
ते विचार होऊन पिढ्यानपिढ्या जगतात
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
=======
0
5
6
8
3
2


