AISSD मार्फत उन्हाळी शिबीराचा समारोप
सविता धमगाये, प्रतिनिधी नागपूर
AISSD मार्फत उन्हाळी शिबीराचा समारोप
सविता धमगाये, प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: दिनांक २० /जून/२०२५ रोज शुक्ररवारला ऑल इंडिया समता सैनिक दलामार्फत उन्हाळी शिबीराचा समारोपीय कार्यक्रम दणक्यात पार पडला. प्रास्तविकात उज्ज्वला उके सचिव महीला विंग महाराष्ट्र यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबीर किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले.
मागील तीन वर्षांपासून शाखा दिघोरी जिल्हा नागपूर मार्फत विद्यार्थ्यासाठी उन्हाळ्यात शिबीर घेतल्या जाते. त्यात कराटे, डांस, आणि यावर्षी इंग्रजीचे सराववर्ग घेण्यात आले. नेहमी उन्हाळ्यात सुट्या लागल्या की मुलांकडे टिव्ही आणि मोबाईल शिवाय दुसरा पर्याय नसतो. पालकही या कालावधीत आपल्या पाल्याकरीता खूप काळजीत असतात कारण मोबाईल आणि टिव्ही चे दुष्परिणाम त्यांना कळतात.
मुलांसाठी खेळायला मोकळे मैदान नाही आणि असले तरी मुलं एकटी बाहेर पाठवणे सुरक्षित नाही. अशावेळी मुलांना काहीतरी वेगळे शिकता यावे हा विचार करून मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने ती सराईतपणे बोलता येणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. इंग्रजी चा अभ्यास विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जातो. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. हे महत्वाचे कार्य दिपक बन्सोड सरांनी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडले.
सहा दिवस इंगजी वर्ग घेतल्यावर रविवारी धम्मवर्गाचे आयोजन करण्यात येत होते, ज्यात मुलांना धम्म समजून घेता आला. समारोपीय प्रसंगी वैभवनगर बुद्ध विहार अध्यक्षा यशोधरा ताई फुलझेले यांनी निरंतर प्रयत्न करीत राहणे किती महत्वाचे आहे हे निरनिराळ्या उदाहरणाने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी दिपक बन्सोड सर यांनी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत. विशेष म्हणजे रोजच्या व्यस्त वेळेतून वेळ काढला हे महत्वाचे आहे. रंजनाताई वासे बौद्धीक प्रमुख महिला विंग महाराष्ट्र तसेच कांतीलालजी भांगे अध्यक्ष महाराष्ट्र यांनी आपल्या व्यक्तव्यातून बाबासाहेबांच्या मातृसंघटनांचे जतन आणि संवर्धन किती आवश्यक आहे हे पटवून दिले.
डॉ. बाबासाहेबांनी समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले म्हणून आज आपली प्रगती आहे तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे महत्व पटवून दिले. यावेळी दुलेवाले सर, माधूरी वसंतशोभा, कुभांरे मॅडम, कमलताई चौधरी, सारीका हुमणे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी दोन महिन्यात जे काही शिकले त्याचे उत्तम प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर सादर केले सर्वच अप्रतिम होते. या उपक्रमात उज्ज्वला उके यांचा सिंहाचा वाटा आहे.
सविता धमगाये अध्यक्ष महिला विंग नागपूर यांनी विद्यार्थ्यांच्या निरंतर प्रयत्न करीत लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा दिली. यावेळी कराटे, नृत्य, गीतगायन, मुलाखत, नाट्य आणि एकांकिका यांची प्रात्यक्षिके झाली.या सर्व कार्यक्रमाची तयारी केली सृजण घोडेस्वार आणि ऋतूजा नागदेवते या गुणी मुलींनी. विजयी विद्यार्थ्यांना ट्राफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अरहंत हुमणे आणि आरोपही पाटील यांनी इंग्रजीतून सूत्रसंचालन केले.



