आगरी समाज संस्थेतर्फे करिअर मार्गदर्शन शिबिराचे रविवारी आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

आगरी समाज संस्थेतर्फे करिअर मार्गदर्शन शिबिराचे रविवारी आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : (ता २२ मे शुक्रवार) आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, पनवेल आणि सेंट विल्फ्रेड ग्रुप ऑफ कॉलेजेस, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता भाग्यलक्ष्मी हॉल, चेंढरे अलिबाग येथे “करिअर मार्गदर्शन व सत्कार समारंभ” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिबाग – मुरुड परिसरातील १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात विशेष गुणगौरव करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षण व करिअरच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या दिशा समजावून देणे हा कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक, प्रेरणादायी वक्ते तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स गौरवित प्रा. विजय नवले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी आणि पालकांना होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी परिसरातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसहित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
याशिवाय ज्या गुणवंत विद्यार्थ्यांशी संस्थेचा अद्याप संपर्क झालेला नाही, त्यांनी तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी श्री. मिलिंद धोदरे (75078 98111) किंवा श्री. राजेंद्र पाटील (94233 75063) यांच्याशी संपर्क साधावा, असेही संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याने सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



