0
4
8
2
9
3
अमरत्व
अमरत्व इथे कुणा मिळाले?
मृत्युची अंतिम सत्य जाणावा
आपण पाहुणे चार दिसांचे
हे जाणून तू घेई मानवा
मर्त्यलोक पृथ्वीला म्हणती
सूत्रधार असे शक्तीशाली
तो नाचवी तसे नाचायचे
आपण कळसूत्री बाहुली
कर्म करणे आपल्या हाती
सत्कर्माची कास धरूया
द्वेष मत्सर दूर सारूया
हर्षगंधाचे मळे फुलवूया
समाधानाची मनी असावे
जनसेवेचे ब्रीदची घ्यावे
कर्म चांगले असे करावे
मरूनीया कीर्तिरूपे उरावे
साऱ्या जगा कटुंब माना
शांततेचे बीज रुजवा
प्रेमाचे धागे गुंफुनीया
हर्षतरु मनी बहरावा
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
0
4
8
2
9
3



