0
4
8
2
8
4
बालसभा
बालसभा आली
आनंद झाला फार
मुले आतुर झाली
मंडण्या मनीचे विचार
आमच्या बालसभेत
मिळाला ज्यांना मान
अध्यक्ष ,पाहुणे असतात
त्याचा रुबाब छान
बालसभेत घडती
थोर वक्तृत्व, कलाकार
अंगी सुप्त गुणांचे
इथेच होते आविष्कार
सभेत चिमुकल्याच्या
घेई सारेच धाव
मिळतो इथेच मंच
कलागुणांना वाव
खूप खूप छान
होते सूत्रसंचालन
काय कौतुक मुलांचे
भारीच आभार प्रदर्शन
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
====≠====
0
4
8
2
8
4



