0
4
8
2
8
4
थोर महान ग आई
थोर महान ग आई
क्षणोक्षणी आठवण
किती दिवस ग ठेवू मी
हृदयी अश्रुंची साठवण….
जशी सावित्री ग माय
तशी थोर मला आई
माझ्या देहाचे ग शिल्प
जिच्या रक्ताची ग शाई…
माझ्यासाठी आहे आई
थोर जिजाऊ ती माऊली
स्वतः सोसून तीव्र चटके
मज दिली शीतल सावली…
संसारातील वादळाशी
लढताना झाशीची राणी
शब्द अपुरे पडती माझी
गाताना तव कष्ट गाणी…
फाटका संसार शिवताना
झिजली काया जणू चंदन
वात्सल्य महासागराला मी
आजन्म विनम्र करते वंदन…
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
============
0
4
8
2
8
4



