न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते कामगार न्यायालयाचे उद्घाटन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते कामगार न्यायालयाचे उद्घाटन
कामगार वर्गाच्या हक्कांचे रक्षण आणि औद्योगिक शांततेसाठी अशा न्यायालयांची गरज ; न्यायमूर्ती जाधव
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : (दि.११ ऑक्टो): आज अलिबाग येथे रायगड जिल्ह्यासाठी च्या कामगार न्यायालयाचे उद्घाटन, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या शुभ हस्ते झाले. कामगार वर्गाच्या हक्कांचे रक्षण आणि औद्योगिक शांततेसाठी अशा न्यायालयांची गरज असल्याचे मत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मध्यस्थी केंद्राचा प्रभावी वापर करून प्रकरणे लवकर निकाली करावी असे आवाहन यावेळी बोलताना न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक न्यायालय मुंबईचे अध्यक्ष विजयकुमार पाटकर हे होते होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत, रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील,तसेच रायगड जिल्हा लेबर कोर्ट प्रॅक्टिसनर्स बार असोसिएशन महाडचे अध्यक्ष अँड. विजय मेहता, तसेच कामगार न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. हांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कामगार न्यायालय सुरू झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कामगार व औद्योगिक वादांच्या सोडवणुकीसाठी स्थानिक पातळीवर न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला असून वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. तसेच वादांचे जलदगतीने आणि न्याय्य पद्धतीने निराकरण होणार आहे. यावेळी ॲड. प्रसाद पाटील यांनी स्वागत पर प्रास्ताविक भाषण केले. तसेच ॲड. विजय मेहता, विजयकुमार पाटकर यांनी ही आपले विचार व्यक्त केले. शेवटी न्यायाधीश गौरव हांगे यांनी आभार मानले.



