कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
हरवले रान आमचे सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर, नागपूर
0
4
8
2
9
0
हरवले रान आमचे
रानोवनी फिरून फिरून,
गोळा करितोय रानमेवा,…
उदरनिर्वाहाचा ठेवला,
जंगलात आमुचाच ठेवा… १
आम्हां आदिवासींच्या जीवनी,
जगण्याचे जंगल साधन…
सरकाराचा तिरपा डोळा,
करीते आयुष्याचं छेदन…२
पालापाचोळ्याचे छप्पर हो,
काड्याकुड्याच्या मोडक्या भिंती…
नाही सुरक्षा भिंत घराला,
नाही अंगात फाटकी चिंधी…३
दुर्मूखलेला आम्हां समाज,
तरी स्वाभिमानाने जगतो…
जंगलातल्या संपत्तीतच,
आम्ही भवितव्याला बघतो…४
हिरावली जंगल संपत्ती,
हिरावले जीवन आमचे…
“सुधाकरा” भावी भविष्याचे,
ते हरवले रान आमचे…५
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर, नागपूर
========
0
4
8
2
9
0



