Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्रमुंबई

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व जुनियर कॉलेज येथे शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 4

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व जुनियर कॉलेज येथे शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे पत्राद्वारे राज्यातील सर्व शाळांना कळविले होते.

त्यानुसार आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून तसेच सर्व शिक्षकाच्या, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून दि. २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह कार्यक्रम राबविण्यात आला.

या अनुषंगाने सोमवार दि. २२ जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मंगळवार दि. २३ जुलै रोजी मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, बुधवार दि. २४ जुलै रोजी क्रीडा दिवस, गुरुवार दि. २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिवस, शनिवार दि. २७ जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टी क्षेपात इकोक्लब उपक्रम – शालेय पोषण दिवस, रविवार दि.२८ जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस अशा प्रकारचे शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश असणारे विविध उपक्रम राबवण्यात आले.

त्याचप्रमाणे शनिवार दि.२७ जुलै २०२४ रोजी इको क्लबची स्थापना करण्यात आली. तसेच आगाखान फाउंडेशनचे प्रकल्प सहायक विराज बांदिवडेकर सर व अंजली पेडणेकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम संपन्न झाली.

या सर्व उपक्रमात बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मधील सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी व इ. ५ वी ते इ. १२ वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती करता खूपच उपयुक्त ठरणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे