ध्वज तिरंगा
विजयी विश्व तिरंगा प्यारा | झेंडा ऊंचा रहे हमारा ||
आज हे गीत संपूर्ण भारतात निनादत आहे. भारताच्या या तिरंग्याचा सन्मान होत आहे. पण ज्यांच्या मुळे स्वातंत्र्य मिळाले आणि ज्यांनी हा तिरंगा तयार केला. त्यांच्या मुळे चं स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचा हा सोहळा संपन्न होत आहे. हे स्वातंत्र्य ज्यांच्या मुळे मिळाले त्यांना आणि डौलाने फडकत आहे त्याचा ‘विसर न व्हावा’ अन पुन्हा ‘नव्याने इतिहास जाणावा. यासाठी माझा हा लेखन प्रपंच. तसे पहाता आपण खूप नशीब वान आहोत म्हणून आपल्या या पिढीला तरी पारतंत्र्याची झळ पोहोचलेलीच नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त कर ण्यासाठी ज्यांनी अक्षरशः ,स्वतःच्या संसाराची होळी केली रक्त सांडून बलिदान केलं. त्यांचं हे बलिदान आपल्या साठी अमृतमय ठरलं.
15ऑगस्ट आणि 26 जानेवारी आले की फक्त आपलं सगळ्यांच देशप्रेम अचानक उफाळून येतं तिरंग्याचा बहुमान केला जातो. दुसऱ्या दिवशी, पण असं जरी असलं तरी, ह्या तिरंगी ध्वजाचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे . पण ह्या ध्वजाबद्दल आपल्याला किती माहिती आहे हा प्रश्न अचानक मनात आला.भारताचा तिरंगा हा आपली आन बाण आणि शान आहे. राष्ट्रभक्तीचं प्रतिक असलेल्या या राष्ट्रध्वजाचं एक विशेष महत्त्व आहे. हा राष्ट्रध्वज सन्माननीय पिंगली वैंकय्या यांनी तयार केला.याची किती लोकांना माहिती असेल.
खर तरं कापसावरील संशोधनामध्ये वैंकय्या यांना विशेष स्वारस्य होते त्यामुळे त्यांची ओळख “कॉटन वेंकैया” अशी देखील होती. हे हाडाचे शेतकरी पण होते तसेच शिक्षणतज्ज्ञ पण होते. 2 ऑगस्ट 1876 हा त्यांचा जन्मदिवस. पिंगली वैंकय्या जेव्हा 19 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी ‘ब्रिटीश आर्मी’ मध्ये प्रवेश घेतला होता. पुढे त्यांनी आफ्रिकेत एका चळवळीत सहभाग घेतला. तेथेच त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली. गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाल्यानंतर पुढे पिंगली वैंकय्या स्वदेशात म्हणजेच भारतामध्ये परतले. येथे त्यांनी मुंबईत रेल्वे गार्डची नोकरी केली.
पिंगली वैंकय्या यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या. 15 ऑगस्ट, 1947 ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज अशी ओळख आणि मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने 22 जुलै 1947 रोजी तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले. राष्ट्रध्वजाची प्राथमिक कल्पना मांडणारे पिंगली वेंकय्या यांचे 4 जुलै 1963 रोजी निधन झाले. अखंड भारताला तिरंगा ध्वज देणाऱ्या या महान विभूतीला संपूर्ण भारत वासियांकडून त्रिवार अभिवादन.!! आता 13 ऑगस्ट ते 15 आगस्ट घरोघर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आपल्या देशाच्या तिरंग्याचा अभिमान बाळगणाऱ्या देशबांधवाना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
अनिता अनिल व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि अहमदनगर
===========



