Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगडचिरोलीचंद्रपूरनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

नागपुरात ‘आदिवासी समाज भवन’ निर्मितीसाठी माजी आ. देवरावजी होळी यांना निवेदन

नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समाज भवनाची आवश्यकता

0 5 4 1 0 0

नागपुरात ‘आदिवासी समाज भवन’ निर्मितीसाठी माजी आ. देवरावजी होळी यांना निवेदन

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या सदस्यांनी घेतली आमदारांची भेट

नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समाज भवनाची आवश्यकता

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि ९ एप्रिल) अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या सदस्यांनी आज (दि ९ एप्रिल) नागपुरात ‘आदिवासी समाज भवन’ निर्मितीसाठी भारतीय जनता पक्षाचे माजी आ. देवरावजी होळी, गडचिरोली यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी समाज भवन निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे निवेदन दिले.

चंद्रपूर, गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील आदिवासी समाजाची अनेक होतकरू मुले दरवर्षी नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात शिकण्यासाठी येत असतात. त्यांना राहण्याची सोय आदिवासी विभागाकडून वस्तीगृहाच्या स्वरूपात करण्यात येते. परंतु विद्यार्थ्यांधी संख्या जास्त असल्यामुळे आदिवासी विकास विभागाकडून ही सोय मोठ्या प्रमाणात अपुरी पडत आहे.

तसेच क्रिडा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी स्वतःच्या हक्काचे क्रीडांगण नाही. तसेच शासकीय अभ्यासिका सुद्धा कमी आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता. आदिवासी समाजच सर्व सेवांनी परिपूर्ण अस एक सुसज्ज समाज भवन स्थापन व्हावं अशी सर्व समाजाची इच्छा आहे.

त्यासाठी लागणारी गोंड राजे विरेंद्र शाह बक्त बुलंद शाह यांच्या मालकीची नागपूर शहरातील रेशिमबाग जवळील भूमापन क्रमांक ५७३ ही ६ एकर जागा ते आदिवासी समाज भदनासाठी शासनाला दान करण्यासाठी तयार आहेत परंतु नागपूर सुधार प्रन्यास मार्फत त्यांच्या मालकीची जागा (po land)म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण नागपूर शहर गोंड राजे बुलंद शाह यांनी बसविलेले असताना आज त्यांच्या संपूर्ण समाज बांधवांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे.

या प्रकरणात विषेश लक्ष घालून ती ६ एकर जागा राजे विरेंद्र शाह यांच्या सुपूर्द करावी आणि दान करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी विनोद मसराम, आकाश मडावी, शाम कार्लेकर, ललित मडावी, सागर इवनाते व डॉ आशीष उजवणे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे