आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला : ड्रमस्टिक राईस
मीनाक्षी काटकर दारव्हा, जि.यवतमाळ
0
4
8
2
9
0
माझी पाककला : ड्रमस्टिक राईस
साहित्य: ५००ग्रॅम बासमती तांदूळ,२००ग्रॅम शेवग्याच्या शेंगा,२००ग्रॅम टमाटर ,वांगे व बटाटे,१वाटी कांदा, खोबरे,आले, लसूण वाटण,एक चमचा गरम मसाला, लाल तिखट १ छोटी वाटी,हळद, दोन चमचे मीठ, तीन मोठे चमचे तेल,एक चमचा जिरे, चिरलेली कोथिंबीर १वाटी.
कृती: शेवग्याच्या शेंगांचे छोटे तुकडे करून साल काढून घ्या.टमाटर, बटाटे चिरून घ्या.कढईत तेल घालून जिरे तडतडले की त्यात कांदाखोब-याचे वाटण घालून चांगले परता.नंतर त्यात शेवग्याच्या शेंगांचे तुकडे,तिखट, हळद,व इतर साहित्य घालून पाणी घाला.उकळी आली की धुतलेले तांदूळ घाला.मंद आचेवर शिजू द्यावे.
वाढप: ही रेसीपी ५ ते ६ जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा, जि.यवतमाळ
=======
0
4
8
2
9
0



