Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

इंडोनेशिया, बाली प्रवास — भाग 1

कुसुमलता दिलीप वाकडे

0 4 8 2 9 4

इंडोनेशिया, बाली प्रवास — भाग 1

आम्ही नागपूरहून 26,मुंबईचे 2 व बंगलोरचे 3 असे एकूण 31 स्त्री-पुरुष दिनांक 4/8/2024 ला रात्री 9.30 च्या विमानाने नागपूर ते मुंबई प्रवास केला. विमान रात्रीच 11.30 ला पोहचले. मुंबई ते कोलंबो व तिसरे विमान 10.30 ते 3.30 जकार्ताला पोहचलोत. व्हीसा, पासपोर्ट तपासून बाहेर पडायला 5 वाजलेत. टूर व्यवस्थापक राज माणिक यांनी ठरवलेली लक्झरी बस आम्हाला घेण्यास विमानतळाबाहेर उभीच होती. माझ्यासोबत माझे पती, माझा भाऊ राहुल मेश्राम, माझी मैत्रीण मंजुषा गौरकार व माझ्या शेजारील वावरे कुटुंबीय व उर्वरित गुप्र मधील मंडळी आम्ही जकार्ता येथील 101 अर्बन हाॅटेल मध्ये पोहचलोत.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे. स्वच्छ व सुंदर देश पोलिस व पोलिस ट्राफिक अधिकारी नसतातच. येथील नागरिक स्वतःच वाहतूकीचे नियम पाळतात. कुणीही गाडी ओव्हर टेक करीत नाहीत. पायदळ जाणाऱ्यांना झेब्रा क्रॉसिंग पूर्वीच फोर किंवा टू व्हीलर गाडया स्वतःच चालक वाहक गाडी थांबवितात. 6 तारखेला आम्ही सकाळी नाश्ता करून सफारी शो बघण्यास निघालोत. ‘जलपरी’ शो मध्ये दोन मुली व एक मुलगा पुढील मानवी शरीर अवयव तर पाठीमागील भाग मासोळीचे होते हे तिघेही पाण्याच्या एक्याॅरीयम मध्ये छान नृत्य करीत होते.

‘सी-लायन’ दोन मुले सी लायन या प्राण्यास घेऊन छान खेळ दाखवित होती नाकावर चेंडू घेऊन पाण्यातुन चालणे, टाळी वाजविणे, त्यानंतर डॉल्फिन शो मध्ये सुध्दा आपआपल्या वेगवेळया कलाकुसरी दाखवित होते आणि हे सर्व करताना दाखविणारी मुले आपल्या जवळ असलेली टिनाच्या डब्यातील छोटया मासोळया त्यांना खावयास दयाची. बर्ड शो मध्ये एक मुलगी सारखी इंडोनेशियन भाषेत बोलायची एका पाण्याच्या तलावाच्याच बाजुला असलेल्या बंद झोपडीतून पोपट, गिधाड,काॅककुआ, घुबड यासारखे पक्षी आम्ही बसलेल्या प्रेक्षकांतील स्टेडियम मध्ये येऊन उडत होती.

उडत येऊन फुगा फोडणे प्रेक्षकांतील एखाद्यास बोलवून त्याच्या खांदायावर वेगवेळी कला दाखविणे. परत शेवटी संपूर्ण पक्षी आपल्या झोपडीत गेली ही झोपडी निसर्गरम्य वातावरणात तयार केलेली होती. 5D शो बघताना गाॅगल देण्यात आलेत माकड उड्या मारताना, साप अचानक चेहर्‍यावर येताना, झाडाचे पाणी स्वतःच्या अंगावर पडताना, पायाला थंडगार स्पर्श, मोठ मोठी झाडे त्यावर पक्षी सुंदर कल्पना वास्तविक वाटत होत्या. बसलेली खुर्ची सुध्दा प्रसंगानुरूप एडजेस्टेबल होती. इथुन बाहेर पडताना सर्वाना आनंद वाटला. हे संपूर्ण शो सम्रुद्रा अन्ड मॅरीन पार्क येथील होती. त्यानंतर ओल्हा पॅसीर पुतीन समुद्राच्या लगत असलेल्या वाळूतील भागात एक उंच सुंदर लावण्या तिच्या गळ्यात फुलांची माळ ओवलेला पुतळा होता, तिथे प्रत्येकांनी व्यक्तीगत तसेच ग्रप फोटो काढलेत. (क्रमशः)

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे