साहित्य गौरव संस्थेतर्फे 50 साहित्यिकांचा गौरव
वसुधा नाईक, प्रतिनिधी
साहित्य गौरव संस्थेतर्फे 50 साहित्यिकांचा गौरव
वसुधा नाईक, प्रतिनिधी
पुणे : (दि 6 ऑगस्ट) साहित्य गौरव संस्थेतर्फे नुकतेच 17 वे साहित्य गौरव संमेलन पहिल्या विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
या साहित्य संमेलनात मंदाताई नाईक, ऋचा कर्वे, मधुकर्णिका सासवडे, वसुधा नाईक, श्रध्दा शिंदगीकर, प्रिया दामले , ॲड. मिलिंद चिंधडे , गजानन पटवर्धन, डाॅ.संजिवनी मुळे, चारुता प्रभुदेसाई, शिवाजी उराडे, कर्नल वसंत बल्लेवार, दीपाराणी गोसावी , मकरंद घाणेकर,ॲड.संध्या गोळे , डाॅ.निर्मला राजपूत , डाॅ.प्रचेतन पोतदार , मनीषा सराफ ,नंदकिशोर गावडै, अशोक सुलाखे, रसिका शाळिग्राम आदि 59 साहित्यिकांचा सन्मान साहित्य गौरव पुरस्काराने करण्यात आला.
प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रशेखर धर्माधिकारी यांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते साहित्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.गीतकार कर्नल वसंत बल्लेवार लिखित ‘ वीर जवान ‘ हे शौर्य गीत बल्लेवार सहित विविध राज्यातून आलेल्या 9 सैनिकांनी सादर केले.
” साहित्य म्हणजे अनुभूतीचे शब्दांकन. विश्वकल्याणाच्या अंतिम उद्दीष्टासाठी साहित्यिकांनी सामाजिक समरसतेवर भर देऊन लेखन करावे ” असे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. एआय, राजकीय नेत्यांनी पक्षांवर केल्यावर मूळ प्रवृत्तीत कितपत बदल घडतो , अमेरिकेसारख्या महासत्तावादी राष्ट्रांची वाढती भांडवलशाही , वाढती ढासळती नीतिमूल्ये, लव्हजिहाद ,आतंकवाद आदि आवाहनांवर चिंतन.मनन करत वर्तमानाचा वेध घेत साहित्यिकांनी लेखन करावे असेही डाॅ.मधुसूदन घाणेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले.
मधुकर्णिका फौंडेशन संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष मधुकर्णिका सासवडे यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.आघाडीच्या कवयित्री
ऋचा कर्वे यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले. मंदाताई नाईक यांनी संमेलनाचा समारोप केला. विविध साहित्य संस्थांनी प्रस्थापित केलेल्या हक्काच्या व्यासपीठामुळेच साहित्य लेखनात यश मिळवता आले अशी कृतज्ञताजीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या ‘ पोपटाचे हायकू ” हा 55 वा काव्यसंग्रह(एम.प्रकाशन )
तसेच डाॅ.घाणेकर संपादितडहाळी विशेषांकही मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी वसुधा फौंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष वसुधा नाईक, कवयित्री मधुकर्णिका सासवडे गझलकार मकरंद घाणेकर, ज्येष्ठ कवी कृष्णकांत चेके, , रमणबाग शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई, ज्योतिर्विद संजिवनी मुळे आदि मान्यवरांची भाषणे झाली.



