Breaking
कविताकोकणनागपूरपुणेसाहित्यगंध

वारी पंढरीची (अभंग लेखन)

पांडुरंग एकनाथ घोलप

0 4 8 2 8 4

वारी पंढरीची
(अभंग लेखन)

वारी पंढरीची | चुकू नये कधी|
नको आधी व्याधी | पांडुरंगा||१||

येता पंढरीसी | सुखावतो जीव |
तुजलागी कीव | येई माझी ||२||

गुंतलो संसारी | उरले न भान |
भूक नि तहान | शमेचीना ||३||

शेतीवाडी माझी | फुला फळा आली |
चिंता सारी गेली | क्षणार्धात ||४||

येताच आषाढी | पाऊले चालती |
मनी नसे भिती | तिळमात्र ||५||

होतोय मार्गस्थ | तुझ्या दर्शनासी |
आस या जीवासी | लागलीसे ||६||

टाळ माझ्या हाती | मुखी तुझे नाम |
नाहीच विश्राम | पावलांसी ||७||

जागर भक्तीचा | अखंड करीन |
वाट ही धरीन | पंढरीची ||८||

होईल संवाद | तुझा माझा देवा |
आनंदाचा ठेवा | मिळवीन ||९||

पांडुरंग एकनाथ घोलप
मु.पो रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे