Breaking
ई-पेपरकविताधाराशिवमराठवाडासाहित्यगंध

उसवलेली वीण

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज) धाराशिव

0 4 8 2 8 4

उसवलेली वीण

स्वार्थाने बोकाळली
नाती झालीत हीन
कशी सांधावी सांगा
उसवलेली वीण //

विश्वास परागंदा
मनी संशय जाळे
जन्मांतरीचे नाते
कुलूप बंद टाळे //

कोणी कोणा जुमेना
मुक्त वार्ता होईना
उसवलेली वीण
काही केल्या सांधेना //

सुसंवाद घडावा
मनोमनी सार्थकी
समूळ नष्ट व्हावे
कुविचार पातकी //

सुसंस्कार विचारी
मने समर्थ व्हावी
उसवलेली वीण
प्रेमानेच सांधावी //

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे