Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

कळलचं नाही; कुसुम पाटील

0 4 8 2 9 0

कळलचं नाही

आपण एकत्र कधी आलो
आपली भेट आठवणीत राहिली
मला तू जेव्हा मोरपीस दिलेस
पुस्तकातील देवाण-घेवाण झाली

विचारांच्या ऐक्य भावना
मैत्री विश्वास प्रेम आले जवळी
जुळले ऋणानुबंध कळलचं नाही
सुंदर रोपटे मित्रत्वाची कळी

सहवासात वाढली मैत्री आपली
भेटण्यासाठी हुरहुर लागली
सुखद क्षणांचा पाठलाग करी
मनातील ओढ गप्पातरंगली

मैत्री तुझी न माझी जुळली
मौज मजा बालपण गेले
कधी बहरली कळलीच नाही
संसाराच्या वाटेवर कधी आले

अवघड झाला जीवन प्रवास
बालपणीचा काळ सुखाचा
आठवणीतला तो कौतुक सोहळा
आवर घालतो आता मनाचा

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे