0
4
8
2
9
3
सत्वपरीक्षा
कस सोन्याचा लागतो
लोखंडाचा मात्र नाही ,
पारख मौल्यवानची होते
साधारणची तेवढी नाही…
विजय सत्याचाच होतो
असत्याचा होत नाही,
सत्वपरीक्षा होते गुणाची
अवगुणाची होत नाही….
तावूनसुलाखून अग्नितून
निघाल्याशिवाय कळेना,
खऱ्याची कसोटी पणाला
लागल्याशिवाय समजेना…
ही तर शोकांतिका खरी
वर्षानुवर्ष चालत आली,
कठीणकाळ परिस्थितीत
सत्वपरीक्षा होत राहीली…
खऱ्याचीचं माय वनवासा
यातना भोगून परत आली,
तो पर्यंत तर लबाडाने इथं
भरपूर मौजमजा ही केली…
पुरुषप्रधान संस्कृतीत ही
सत्वपरीक्षा स्त्रीची झाली,
निष्कलंक पवित्र सीतेला
अग्निपरीक्षा द्यावी लागली…
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
4
8
2
9
3



