Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*

*🥀विषय : संवादशून्य🥀*
*🍂बुधवार : ११ / जून /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*संवादशून्य*

गावाकडचा गजबजलेल्या
रस्त्यावरती सन्नाटा पसरला
पार बिचारा एकटा बसला
संवादशून्य गावही भासला…

विभक्त कुटुंब पद्धतीने तर
रक्ताचाही जिव्हाळा संपला
कोणी बोलेना कोणाशी आज
कळेना कोण कशात व्यापला?

प्रेम आपुलकी माया ममता
शब्दसंग्रह फक्त पुस्तकातला
द्वेष मत्सर वटवृक्षापरि येथे
हरवत चालला काळजातला…

पोळा दसरा वा असो दिवाळी
मूक शुभेच्छा संदेश धडकला
ख्यालिखुशाली कोण विचारतं
मोबाईलमध्ये जो तो अडकला…

जिवंत असूनही संवेदनाशून्य
परदुःखाने ना अश्रू नयनाला
सुसंवाद तर नाहीच उरलाहो
पण माणूस संवादशून्य झाला…

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🔸🔖➿➿➿➿
*संवादशून्य*

भावना झाल्या बोथट
राहिली ना आपुलकी
आपसात नाही संवाद
कुठे हरवली माणुसकी?

यंत्रवत झाले जीवन
वाढली सुख समृद्धीची हाव
संवादशून्य झाला मानव
केवळ पाही संपत्तीचा ठाव

संवादाची जागा आजकाल
घेतली आहे मोबाईलने
जो तो त्यात गर्क इतका
कधी बोलेल फुरसतीने?

विचारांचे आदानप्रदान
आजमितीला होत आहे कमी
कसे होईल वहन त्यांचे
मिळेल का कधी हमी?

नात्यानात्यात पडली दरी
संस्काराची पडली वाण
जो तो बघे आपल्यापुरते
नाही कुणाच्या समस्येची जाण

आई,वडील, मुले संबंध
आहे केवळ बंद मुठीत
पैशासाठी करिअर करा
शिक्षणाची ही झाली रीत

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🔸🔖➿➿➿➿
*संवादशून्य*

लोक दिसतात धावताना
धनसंपत्ती कमवायला.
आज माणूस माणसाशी
कसा संवादशून्य झाला.

मोबाईलमुळे बसतात
संवादशून्यतेच्या झळा;
ना राहिली आपुलकी,
ना राहिला जिव्हाळा.

मूल अन् मायबापातील
नातं संवादशून्य झालं;
नात्यात नसे ओलावा,
म्हणे तुम्ही काय केलं?

गुरु-शिष्य संवाद संपला,
नसतं महत्त्व शिक्षणाला;
सरकारच्या व्यवस्थेने
बेरोजगार युवक झाला.

पर्याय शोधावा लागेल
संवादशून्य व्यवस्थेला,
नाहीतर धोका पत्करावा
लागेल येणाऱ्या पिढीला.

*डॉ. बालाजी राजुरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🔸🔖➿➿➿➿
*संवादशून्य*

आला मोबाईल जमाना
तऱ्हा त्याची पहा ना
प्रत्येकाच्या हातात
बसला कसा थाटात

सगळं जगच बघा
त्याच्यात कसं समावलं
मुठीत माणसाच्या
सारं विश्व् साकारलं

नाना तऱ्हा नी ढंग
नाना रूपे करती दंग
वाटलं होतं होऊ ज्ञानी
मिळवू ज्ञान अभंग

एवढी कशी दुनिया
आहारी हो गेली
मोबाईल विश्वालाच
सर्वस्व मानू लागली

कॉल चॅटिंग रिल्स
मेसेज इन्स्टा फेसबुक
त्याने सामावून घेतलं
मुळ हेतूला काळं फासलं

आभासी दुनिया इथं
खरी भासू लागली
फसवणूक नाना रीतींनी
वाट्याला मग आली

खऱ्या प्रेमाला आता
माणसं पारखी झाली
संवादशून्य आयुष्य
बेफामपणे जगू लागली

*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, छ. संभाजीनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🔸🔖➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*संवादशून्य*

संवादशून्य माणसांची
झाली जगात भरती
रुपयाचीच आहे सध्या
दुनियेत या चलती

मुखवटेधारी पुतळेच
जिथे तिथे भेटतात
माणसांचे खरे चेहरे
कधी कुणाला दिसतात?

माणसे पशुसम म्हटले
तरी पशूंना असती भावना
खाल्ल्या मिठा जागण्याचा
दिसती धर्म निभावताना

माणुसकीच इथे लोपली
संवेदनाच हरपलेली,
पैशा मागे धावणारी,
माणसांची यंत्रे जाहली

जगाशी नाती जोडताना
आभासा मागे धावले
घरात संवाद हरपले
नात्यांचे बंधची तुटले

भोवताली अत्याचार
सातत्याने घडले जरी
ढुंकूनही न पाहता
लोक वागती त्रयस्थापरी

कुणाच्या जीवावर बेतले
तरी त्याचे ‘रील’ बनवती
लाईक, कमेंट्स, साठी
हे माणुसकी विसरती

स्वार्थाचा भरला बाजार
नीतिमत्तेची लागे बोली
बळी येथे कान पिळी
निष्पापांचा हकनाक बळी

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🔸🔖➿➿➿➿
*संवादशून्य*

संवाद म्हणजे नसतं केवळ आपापसात बोलणं
ते तर असतं मनाची मनाशी सांगड घालणं…

जगण्यालाही अर्थ येतो जेव्हा होतो संवाद परस्परांशी
नात्याला ही बांधून ठेवतो तो एकमेकांशी..

परी आयुष्यात आले आता आधुनिक तंत्रज्ञान
अति वापरामुळे त्याच्या माणसं झाली संवाद शून्य..

वाटले की आले मोबाईल, संवादालाही आता नवा मार्ग मिळाला
पण त्याच्यातील फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सअप मुळे तो पुरा चुकला…

शब्द ही झाले मूक, भावना ही नगण्य वाटू लागल्या
काळजी, चिंता ही मनात तशाच साठवून राहिल्या..

एकाच घरात एकाच छताखाली जरी होती सारे गोळा
तरी मोबाईलच्या संदेशातून सुरू होतो इमोजीतला सोहळा..

या संवादशून्यतेमुळे जवळ असूनही जन्म झाला दुराव्याचा
विचार कर माणसा, यातून आता मार्ग कसा काढायचा..

*सौ अनिता अनिल व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*?
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🔸🔖➿➿➿➿
*संवादशून्य*

संवादशून्य नको माणसे
मुक्या अबोल सहवासात
टाळाटाळ करते तू बोलाया
मज करमेनासे अजिबात !!

मुक्यासी नाही वाणी
कसे देऊ मी प्राधान्य
काहीच विधान करेना
मुर्दाड कृती अमान्य !!

असंवेदनशिल भावना
शब्दभांडार कमी आहे
वाच्येचा दोष म्हणू का ?
संवाद वजावट होत आहे !!

भिन्न व्यक्ती स्वभावी
मग निर्माण न्यूनगंड
विचारात आढळी फरक
लागले काय वदनी मापदंड !!

सृजन वाक्य झाले दुरापास्त
सुसंवाद कानाशी ऐकू येईना
वक्तेही मांडेना मुद्देसुद ढंगाचे
सुसंगतीअभावी मुकलोना !!

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🔸🔖➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे