शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*
*☄विषय : जनगणना☄*
*🍂शनिवार : ०४/०४/२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*जनगणना*
देशभरात एप्रिल पासून
सुरू होणार जनगणना
केंद्र सरकारने काढले फरमान
माहितीने सतर्क केले सर्वांना
जनगणने दरम्यान व्यक्तीची
व्यक्तीची माहिती गोपनीय राहणार
राहण सुरक्षित डाटा मध्ये
न माहिती विकली जाणार
ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल
सुरक्षित सुविधा नोंदणीची
ना होणार त्यात फेरबदल
स्वतःला मिळेल संधी भरण्याची
ही गणना थोडी त्रासाची
शिक्षकांना लावले कामाला
वाढला त्रास त्यांचा डोक्याचा
मुकले ते आता सुट्टीला
आहे ही राष्ट्रीय जनगणना
जाती निहाय बिना भेदभाव
कुठलीही चूक न करता
पिंजून काढणार गावोगाव
तरच मिळणार प्रत्येकाला
कायद्यानुसार मतदानाचा हक्क
हा संविधानाचा मूलभूत अधिकार
सारेच होणार पाहून थक्क
यात जात धर्माचा नाही विचार
मानवतेला मिळणार आधार
घर,कुटुंब जोडपी ,, मालकी
यांचीच माहिती घेतली जाणार
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔻〽️🔻➿➿➿➿
*जनगणना*
खडू निःशब्द,
फळा उदास…
हातात कागद,
सुरू प्रवास…
दारोदार पाऊल,
आकड्यांचा श्वास…
ज्ञान दुरावले,
हरवला सुवास…
अध्यापन विरलं,
लयही हरवली…
विद्यार्थी नजरेत,
प्रतीक्षा साचली…
जनगणना येता,
वेळच गुंतला…
गुरुचा दीप,
क्षणात मंदावला…
वहीतल्या ओळी,
शांतच राहिल्या…
अक्षरांच्या वाटा,
एकाकी झाल्या…
चौकटीत स्वप्नं,
धूसर उमटली…
गुरुच्या स्पर्शाची,
ओढच दाटली…
घड्याळाच्या काट्या,
फिरतच राहिल्या…
क्षणांच्या ओंजळी,
रिकाम्या ठरल्या…
मनातली ज्योत,
तरीही जिवंत…
वेदनेतून उगवे,
ज्ञानाचं दैवत…
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔻〽️🔻➿➿➿➿
*जनगणना*
दहा वर्षांनी होते भारताची जनगणना,
ही एक महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया
त्यातून मिळालेल्या माहितीतून आखल्या जातात
देशाच्या विकासाच्या दिशा
जनगणना करण्यासाठी येतील बंधू-भगिनी घरोघरी,
द्या त्यांना योग्य माहिती
देशहितासाठी करू या सहकार्य,
हीच नागरिकांची कर्तव्यनिष्ठा खरी
घराघरातील माणसांच्या घेतल्या जातील साऱ्या नोंदी
त्यातून उलगडेल भारताच्या लोकसंख्येची खरी आकडेवारी
घर, गाव, शहर, रस्ते साऱ्यांची होईल नोंदणी
त्यातूनच उमटेल देशाच्या प्रगतीची खरी कहाणी
देशाच्या आर्थिक-सामाजिक विकासाबरोबर साक्षरतेचीही मिळेल माहिती
लोकसंख्या, जात, शिक्षण, भाषा, धर्म साऱ्यांची होईल गणती
चला तर मग देऊया माहिती अचूक आणि सजगपणे
जनगणनेसाठी होऊ या सज्ज, नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यभावनेने
*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔻〽️🔻➿➿➿➿
*जनगणना*
जनगणना करण्यासाठी
माझी ड्युटी लागली बाई
अशैक्षणिक कामे लादली
नोकरी सोपी नाही गं बाई ||
शासन परीपत्रक आदेश आले
कर्मचारी सारे व्यस्त झाले
उन्हाळी सुट्टी उपभोगता येईना
जनजागृती करते ग बाई ||
प्रभागवार लोकसंख्या मोजाची
नोंदवहीत आकडेवारी नोंदाची
जिवंत सजिवांची करू बेरीज
मृतांची वजाबाकी करू बाई ||
असली सेवा नको ग मला
भटकी कुत्री लावी शोधायला
पिसाळलेले श्वान चावा घेई
बेतले प्रसंग काय सांगू अहवाल बाई ||
घाईघाई निघते वेळेत पोहचते
विलंब न व्हावा म्हणूनिया
पवन म्हणे नाटयात जुंपलया
तारेवरची कसरत चाले बाई ||
*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔻〽️🔻➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*जनगणना*
जनगणणा करूया देशवासिंयो
लोकसंख्येला आळा घालून
उपासमार टाळून,भारतीयांनो
सुखा समाधानाने दाखवू राहून ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔻〽️🔻➿➿➿➿
*जनगणना*
लोकसंख्या वैशिष्टये अन् योग्य आकडा
योजनांच्या विकासाचा हा मुख्य कणा..
संपूर्ण देशाचा हितासाठी आवश्यक
दहा वर्षांने होणारी कायदेशीर जनगणना…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔻〽️🔻➿➿➿➿
*जनगणना*
जनगणना देशाची आकडेवारी मोजणी
प्रक्रिया ही दहा वर्षांनी राबवतात
भविष्यातील प्रशासकीय सर्वेक्षण
सरकार विकास धोरण आखतात
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔻〽️🔻➿➿➿➿
*जनगणना*
राष्ट्रीय कार्य हे देशाचे
हातभार लावूया सर्व
जनगणना भारताची असे
देशवासियांसाठी एक पर्व
*सौ अर्चना जगदिश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔻〽️🔻➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



