लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण काँग्रेस केले- मल्लिकार्जुन खर्गे
लोकशाहीचे आणि संविधानाचे रक्षण काँग्रेस केले- मल्लिकार्जुन खर्गे
प्रतिनिधी-
महाराष्ट्र विधान सभेचा प्रचार अंतीम टप्प्यावर आला आहे. सर्व पक्षाने आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडुन येण्यासाठी कंबर कसली आहे. ज्या पक्षाचे जास्त प्रतिनिधी त्याला सत्तेत पन चांगला वाटा मिळू शकतो. त्याच अनुशंगाने राष्ट्रीय नेते व स्टार प्रचारक आपल्या उमेदवारांसाठी धावपळ करत आहेत. उमरेड विधान सभेचे महााविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विराट आणि मोठी सभा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस चे मान्यवर उमरेड नगरीत उपस्थित होते. या वेळी बोलतांना श्री. खर्गे जी यांनी आपल्या अभ्यासू आणि दमदार भाषणाने उपस्थित बांधवांचे मने जिंकली.महाराष्ट्र मध्ये आपली महा आघाडीची सरकार येणार आहे कारण जनता ही भ्रष्ट मार्गाने आलेल्या सरकारला उलथून टाकणार आहे. देशातील मोदी सरकार हे जनतेची दिशाभूल करुन आणि थापा मारुन निवडून आले आहे. जनतेला त्यांचे संविधान बदलाचे डाव वेळीच समजले आणि जनतेने त्यांना जागा दाखवून दिली.आता परत वेळ आलेली आहे , आपन सर्वानी मिळून आणि एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या उमेदवार यांना निवडुन देवु. उमरेड विधान सभेचे लोकप्रिय उमेदवार संजय मेश्राम यांना मोठ्या मतांनी विधान सभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. भारतीय जनता ही सुसंस्कृत आहे. ते गद्दारांना घरी बसवल्या शिवाय राहणार नाही. आपन सगळे सोबत आहोत विरोधी पक्षाच्यां कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही. काँग्रेस ची “पंचसुत्री” यावेळी विस्तृतपणे त्यांनी सांगितली.राज्यातील सरकार ही सामान्य माणसाची सरकार नाही पैशाचा आणि भ्रष्ट मार्गाने आलेली ही सरकार आहे. उद्योगपति ला अनेक कोटीचे कर्जमाफी देणारे आणि त्यांच्या समोर लोटांगण घालणारे हे सरकार जनसामान्यांचे नाही. शेतमालाचे भाव आज या सरकारने पाडले आहे आणि उद्योगपतींनी लाभ मिळवून हे भाजपचे लोक मोठे होत आहेत. महिला अत्याचार यावर यामधील एकही प्रतिनिधी शब्द काढत नाही. आपन सर्वानी मिळून एकत्रितपणे काँग्रेसचा ‘हात’ यावरच विश्वास ठेवावा.आपल्या दिमाखदार शैलीत चौफेर मराठी भाषेत फटकेबाजी करत श्री खर्गे साहेब यांनी नवचैतन्य निर्माण केले.
माजी मंत्री नितीन राऊत आपल्या भाषणात म्हणाले, काँग्रेस उमेदवार यांच्या साठी सर्वत्र उत्साह बघत आहे. लोक परिवर्तन नक्कीच करणार आहे. केन्द्रीय भाजप सरकारने महागाई आणी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे. लोकसभेच्या निवडणूक वेळी 400 पार चा नारा देवुन संविधान बदलनेसाठी प्रयत्न हे जुलमी भाजप प्रनित सरकार करणार होते पन जनता जनार्दन आहे त्यांनी बरोबर मतपेटीतून त्यांना धडा शिकवला. घोटाळेबाज आणि धर्माच्या नावावर मत मागणारे हे सरकार आहे त्यांना त्यांची जागा पुन्हा एकदा दाखवुन द्या. उमरेड विधान सभेला शिक्षित आणि प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व लाभले आहे त्यामुळे आपन त्यांना साथ द्यावी आणि प्रचंड मतांनी निवडुन द्यावे.
यावेळी प्रकाश झा यांनी केन्द्र सरकारवर टीका करतांना अनेक मुद्दयावर परखड मत मांडले
खासदार शाम कुमार बर्वे म्हणाले की,दिल्लीतील जबाबदारी मी सांभाळतो राज्यातील जबाबदारी सांभाळणे साठी मेश्राम साहेबांचे ‘हात’ बळकट करा. अतिशय अभ्यासू आणि जनमानसाच्या प्रश्नांबद्दल तळमळ असणारा उमेदवार काँग्रेस पक्षाने मेश्राम साहेबांच्या रुपाने दिला आहे. उमेदवार श्री. संजय मेश्राम यांनी आपल्या अभ्यासू भाषणात विधान सभा क्षेत्रातील बेरोजगारी , महिला, तरुण यांचे प्रश्न यावर परखड मत मांडतांना सांगितले की, उमरेड विधानसभा क्षेत्रातील गाव व शहर यांच्या समस्या वेगळ्या आहेत. जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्षच काम करत आहे. शेतकर्यांच्या कायम स्वरूपाचे सिंचन मिळावे, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतीवर आधारीत उद्योग व्यवसायांची उभारणी करुन मोठा रोजगार निर्माण करणार आहे. या वेळी मग मंत्री नितीन राऊत, सुरज हेगडे, क्षितिज अड्याळकर, राजकुमार खुराणा, मुकेशजी बैस, गंगाधरजी रेवतकर, बाबा अष्टनकर, अश्वीन बैस, सुरेश पौनिकर, दिलीप गुप्ता, शिवदास कुकडकर, बंडुभाउ ढाकुनकर, उपासाला भुते, योगिता इटनकर, शंकर डडमल, नेमावली माटे,मनोज तितरमारे, माधुरीताई देशमुख, गीतांजली ताई , वंदना मोटघरे, नागभिडकर, ठाकरे ताई, प्रविण कुंटे, विनोद हरडे , चंद्रशेखर बावनकुळे,संदिप निबार्त , केतन रेवतकर, रितेश राऊत, गुणवंत मांढरे , याचप्रमाणे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य एसटी एसटी ओबीसी महिला सेल पदाधिकारी महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते



