53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री सरस्वती भुवन प्रशाला, बालानगरचा सहभाग
पद्माकर वाघरूळकर, ईश्वर कसबे प्रतिनिधी
53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री सरस्वती भुवन प्रशाला, बालानगरचा सहभाग
पद्माकर वाघरूळकर, ईश्वर कसबे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
बालानगर दि.१ (प्रतिनिधी)- 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पी. एमश्री जिल्हा परिषद प्रशाला गणोरी, ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये श्री सरस्वती भुवन प्रशाला बालानगरने प्राथमिक विभाग प्रयोग गटात ‘मनोरंजक गणितीय मॉडलिंग’ हा प्रयोग सहशिक्षक सुधाकर येवतीकर यांच्या मार्गदर्शनात दिव्या बाबासाहेब कदे या विद्यार्थिनीच्या साहित्याने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला.
यासोबतच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक साहित्य निर्मिती प्राथमिक गटातून सुधाकर येवतीकर यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला. या सहभागाबद्दल मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष सत्यनारायणजी सोनी व शालेय समितीचे सर्व सदस्य, सर्व शिक्षकशिक्षकेतर सहकारी व विद्यार्थ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.



