0
4
8
2
9
0
माहेरची माया
मनाचे ओढ माहेरची माया
पावलोपावली वटवृक्षाची छाया
माहेरी गोड ममतेची माणसे
आनंदाने फुलून येते काया
आई बाबांची लाडकी छकुली
आईच्या संस्कारात वाढली
उबदार कुशीत झोपली
माय ममतेची सावली
लग्न होताच आली सासरी
स्त्री मनाची व्यथा अन् कथा
सणासुदीला येते माहेरी
सुखदुःखाचे मांडते व्यथा
आई बाबांची लेक लाडकी
आनंदाने करते संसार
ओझं वाटत नाही संसाराच
जुळून घेते अभिमानानं सासर
माहेरची माया लाभली लेकीला
सासू-सासर्यांची सेवा करी
ओलांडून सासरचा उंबरठा
नेहमी असे ती सुखी संसारी
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=========
0
4
8
2
9
0



