Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमराठवाडासाहित्यगंध

शिक्षक असण्याचा अभिमान

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता. उमरगा, जिल्हा धाराशिव

0 4 8 2 9 0

शिक्षक असण्याचा अभिमान

आज मी तुमच्यासमोर
एका गोष्टीसाठी उभा आहे –
ती म्हणजे माझा सर्वात मोठा अभिमान!
आणि तो अभिमान म्हणजे –
“मी एक शिक्षक आहे!”

शिक्षक म्हणजे, फक्त धडा शिकवणारा नसतो,
शिक्षक म्हणजे, अंधारात वाट दाखवणारा दीपस्तंभ असतो!
शिक्षक म्हणजे, ज्ञान देणारा झरा, संस्कार देणारी गंगा!
शिक्षक म्हणजे, भविष्याची स्वप्नं घडवणारा शिल्पकार!

माझ्या आजीला जाऊन दोन वर्षे होतात
तर आई वडीलांना जाऊन पंचवीस वर्षे होतात
पण त्यांची आठवण कायम रहाते
माझ्या आजीची, आईची आणि वडिलांची
तीव्र इच्छा होती –
“आमच्या लेकरांनी शिक्षक व्हावं.”
कारण शिक्षकाची नोकरी ही नुसती उपजीविका नाही,
ती आहे, कर्तव्याची साधना, प्रामाणिकतेची सेवा
आणि समाजाला दिशा देण्याची जबाबदारी!

माझ्या घरातील या स्वप्नपूर्तीसाठी माझे नशीब धनी आहे.
वैकुंठवासी सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर आणि
सद्गुरू उज्वलानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मला व माझ्या बहिणीला सुध्दा गटशिक्षणाधिकारी कार्यालय उमरगा येथे विषय तज्ञ म्हणून नौकरी आहे. ही पवित्र सेवा लाभली.

प्रिय मित्रांनो,
डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ, नेते
अधिकारी सगळे घडतात.
पण लक्षात ठेवा –
“त्यांच्या मागे कुणीतरी शिक्षक असतो!”
शिक्षक नसता तर कोणताही डॉक्टर जन्माला आला नसता,
कोणताही शास्त्रज्ञ जगाला नवा शोध देऊ शकला नसता,
कोणताही नेता देशाला दिशा देऊ शकला नसता.

म्हणूनच म्हटलंय –
“शिक्षक घडवतो ते डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आणि अधिकारी,
पण शिक्षक घडवतो तेव्हा तो सर्वात आधी ‘माणूस’ घडवतो!”

आज जेव्हा मी वर्गात उभा राहतो
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील चमक पाहतो,
त्यांच्या मनातील जिज्ञासा जागृत करतो,
तेव्हा मला वाटतं –
हेच माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे.

प्रिय विद्यार्थ्यांनो, मी शाळेत गेल्यावर
पहिल्यांदा पहिल्या पायरीचे दर्शन घेतो
आणि विद्यार्थ्यांना भेटतो हा सर्वात मोठा आनंद आहे.
मी तुम्हाला पुस्तक देऊ शकतो,
पण ज्ञान घ्यायचं काम तुमचं आहे.
मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो,
पण चालायचं काम तुमचं आहे.
मी तुमच्यात ज्वाला पेटवू शकतो,
पण त्या ज्वालेचं प्रकाशात रुपांतर करायचं
काम तुमचं आहे!

आणि म्हणूनच…
आज मी ठामपणे सांगतो
शिक्षक म्हणजे आशेचा किरण,
शिक्षक म्हणजे संस्कारांचा उगम,
शिक्षक म्हणजे भविष्याचा पाया,
आणि शिक्षक म्हणजेच समाजाचा खरा शिल्पकार!

माझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान,
मला आजपर्यंत पन्नास आदर्श शिक्षक पुरस्कार
मिळालेले आहेत. त्यापेक्षा मी ग्रामीण भागातील शाळेत शिकवायला आहे. हा सर्वात मोठा अभिमान म्हणजे “मी एक शिक्षक आहे!”

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा, जिल्हा धाराशिव
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे