0
4
8
3
0
1
किती धावशील
कशासाठी अन् कुणासाठी
धावतोस गड्या जीव ओतून
काय आणलस अन काय
नेशील गड्या जाता जीवनातून …१
भांडत सुटला सर्वांशी
धन कमविण्या कुणासाठी
तुझ्या धनाची किंमत नसे
तू कमवितो ज्याच्यासाठी ……..२
अर्धपोटी राहुन कष्ट करतो
सुखी मुलबाळ कराया जेव्हा
वृद्धहोता भांडती मूल धनासाठी
नसे तयार पोसाया तेव्हा ………३
कित्येक पाठवले परदेशी
शिकन्या होऊंनी कर्जबाजारी
मरण तुला येताना वेळ नसे
त्यांना तुला नेण्या सरणावरी ……४
संस्काराचे धन दे तुझ्या मुला
अंतिम क्षणा सुखी होशील
त्यांना जगू दे त्यांचे जीवन
स्वतः साठी जरा जगशील ………५
डॉ. बालाजी राजुरकर
हिंगणघाट जि. वर्धा
========
0
4
8
3
0
1



