0
4
8
2
9
0
अश्रूधारा
अराजकतेने गाठला कळस
जुलमी सत्तांच्या अन्यायाने
नव्हताच कुणी वाली येथे
रोखावया यवना प्रतिकाराने
शिवनेरीवर वीर अवतरला
माॅंजिजाऊंच्या कुशीतून
दिले धडे हे बुद्धीचातुर्याचे
सोडवण्या रयतेला त्रासातून
शपथ घेतली बालशिवबांनी
फौज सोबतीला मावळ्यांची
निर्माण करीन रयतेचे राज्य
रायरेश्वरी स्वराज्यस्थापनेची
धाक बसवण्या गनिमांना
स्वराज्याला या हवा राजा
घाट घाले राज्याभिषेकाचा
गेले आनंदून मावळे नि प्रजा
जिजाऊंच्या स्वप्नांची पूर्ती
केली शिवबांच्या पराक्रमाने
आकारीले रयतेचे स्वराज्य
दिला आशीर्वाद अश्रूधारेने
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=========
0
4
8
2
9
0



